
no images were found
इंडियाज गॉट टॅलेंटच्या नवीन सत्रात किरण खेर पुन्हा एकदा बजावणार परीक्षकाची भूमिका
‘विजय विश्वहुनर हमारा’ हा विश्वास घेऊन येत आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील टॅलेंट रियलिटी शो,इंडियाज गॉट टॅलेंटचे नवे सत्र– इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10.पुन्हा एकदा हा मंच अशा सामान्य माणसांवर प्रकाश झोत टाकेल, ज्यांच्यात या प्रतिष्ठित मंचावर आपले अपूर्व कौशल्य दाखवून असामान्य बनण्याची क्षमता असते. या शोमध्ये डान्सर, गायक, जादूगार तसेचजुन्या भारतीय कलांचे पुनरुज्जीवन करणारे विविध कलाकार आपली असामान्य कला सादर करून प्रेक्षकांना अवाक करतील. देशातील आजवर प्रकाशात न आलेली रत्ने आणि त्यांची अद्भुत प्रतिभा लोकांसमोर आणणारा हा सीझन सुरू होत आहे 29 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता.
या टॅलेंट शोच्या सतत 10 व्या सीझनमध्ये किरण खेर परीक्षकाची भूमिका बजावणार आहे. आजवर तिच्या रत्नपारखी नजरेने देशाला अनेक उत्कृष्ट कलाकारांचा परिचय करून दिला आहे. तिचा उत्साह, गुणी कलाकारांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती आणि नैपुण्य पुन्हा एकदा या स्पर्धेचा विजेता निवडण्यासाठी मोठा हातभार लावेल.
परीक्षकांच्या पॅनलवर परत येण्याचा आनंद व्यक्त करताना किरण खेर म्हणाली, “माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण इंडियन आयडॉल 10 व्या सत्रात प्रवेश करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हा शो आणखी मोठा मोठा होत गेला आहे. प्रतिभेची व्याख्या करणारा तो एक राष्ट्रीय मंच बनला आहे. इतकेच नाही, तर या शो ने भारतीय प्रतिभेला जागतिक स्तरावर नेले आहे.या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करतानाया मंचावर ‘हुनर’च्या माध्यमातून मला खऱ्याखुऱ्या आणि होतकरू भारताचे दर्शन घडले आहे.