
no images were found
नवीन दबंग दुल्हनिया ‘राजेश’च्या भूमिकेत दिसणार गीतांजली मिश्रा
भारतीय टेलिव्हिजन मनोरंजनाचे माध्यम म्हणून अनेक घरांमध्ये पाहिले जाते. तसेच भारतीय टेलिव्हिजनवर अनेक लक्षवेधक व उत्साही पात्र पाहायला मिळाले आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. असेच एक लोकप्रिय पात्र आहे एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश सिंग. आणि आता प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली मिश्रा मालिकेत राजेशची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.
गीतांजली मिश्रा अद्वितीय अभिनय कौशल्यांसाठी, तसेच टेलिव्हिजन मालिका व वेब सिरीजमधील अद्भत परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. अत्यंत लोकप्रिय मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये राजेशची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबाबत आपला उत्साह व्यक्त करत गीतांजली मिश्रा म्हणाली, ”मला भारतातील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक राजेशची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. प्रेक्षक म्हणून मला लक्षवेधक पात्र व मनोरंजनपूर्ण कथानकामुळे ही मालिका पाहायला आवडते. मालिका मनोरंजन करण्याबाबत कधीच मागे ठरत नाही आणि प्रेक्षकांना नेहमी काहीतरी उत्साहवर्धक व रोचक पाहायला मिळते. माझ्या स्वप्नामध्ये देखील मी टेलिव्हिजनवर पाहायला आवडणारे पात्र साकारण्याची संधी मिळेल अशी कल्पना केली नव्हती.
माझ्यामधील उत्साह व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत आणि यापेक्षाही अधिक अविश्वसनीय बाब म्हणजे मला योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग), हिमानी शिवपुरी जी (कटोरी अम्मा) यांच्यासारख्या अनुभवी व सर्वोत्तम कलाकारांसोबत, तसेच उर्वरित पलटनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी आणि मला ही अद्भुत संधी देण्यासाठी मी एण्ड टीव्ही व आमचे निर्मात संजय व बिनायफर कोहली जी यांचे मनापासून आभार मानते. मी स्वत:ला नशीबवान मानते. माझ्याप्रमाणेच उत्साहित असलेले माझे मित्रमैत्रिणी व कुटुंबिय मला नवीन राजेशच्या भूमिकेत पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत.”
राजेशची भूमिका साकारण्याबाबत गीतांजली म्हणाली, ”प्रसिद्ध असलेली भूमिका साकारणे सोपे नाही, कारण प्रेक्षक कलाकार व भूमिकेशी सखोलपणे संलग्न असतात. पण, मी मनापासून ही जबाबदारी पार पाडण्यास सज्ज आहे. मला ही भूमिका साकारण्याकरिता माझ्या क्षमतेवर विश्वास आहे, कारण मी या भूमिकेची निस्सीम चाहती आहे, तसेच मी मालिका देखील पाहिली आहे.