
no images were found
बंगळुरू येथे मेट्रोचं काम सुरू असलेलाच खांब कोसळून दोघे ठार
बंगळुरू : येथील नागवाडामध्ये मेट्रोचा बांधकाम सुरू असलेला खांब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण जखमीही झाला आहे. या अपघाताला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी सांगितलं की, सकाळी 10.45 च्या सुमारास मेट्रोचे बांधकाम सुरू असलेला खांब कोसळला. कोसळलेल्या खाबाला एका दुचाकीची धडक बसली. या दुचाकीवर चार जण स्वार होते. दुचाकीवर लोहीत याच्यासोबत त्याची पत्नी तेजस्विनी आणि त्यांची जुळी मुलंही होती. या अपघातात लोहित जखमी झाला आहे. तेजस्विनी आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाले होते, यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लोहित आणि त्यांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, दुचाकीवरील पती-पत्नी दोघांनीही हेल्मेट घातले होते.