no images were found
महाराष्ट्र ऑलम्पिक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरला अजिंक्यपद
पुणे : बालेवाडी येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेतील पुरुष फुटबॉल गटात के.एस. ए. कोल्हापूर जिल्हा संघाने पुणे जिल्हा संघाचा विरुद्ध ३ विरुद्ध २ दोन गोलने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत पूणे, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई, कोल्हापूर, परभणी, सांगली व नागपूर अशा आठ संघांचा समावेश होता.
कोल्हापूर संघाच्या करण चव्हाण-बंद्रे यांने ११,३० व ७० व्या मिनिटांना गोल नोंदवून स्पर्धेतील हॅट्रीक केली. प्रथमेश हेरेकर, ओंकार मोरे व रोहन आडनाईक यांच्या पासवर करणने गोल नोंदविले. आघाडी फळीत राहूल पाटील, ऋतुराज पाटील मध्य फळीत रोहन आडनाईक, प्रभू पोवार, कैलास पाटील, बचाव फळीत अरबाज पेंढारी, विशाल पाटील व ऋतुराज सुर्यवंशी यांनी उत्कृष्ट खेळ केला. गोलकीपर मयुरेश चौगुलेने उत्कृष्ट गोलरक्षण केले या स्पर्धेत कोल्हापूर संघांने परभणी संघांस ६-0 गोलफरकाने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत नागपूर संघावर ३- ० गोलफरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे बक्षीस समारंभ विफाचे खजानिस सुहास पाटील, प्यारेलाल चौधरी व प्रदीप परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाला. विजेता खेळाडूंना मेडल्स्, ट्रॅकसूट व ट्रॉफी देणेत आली.
संघातील खेळाडूंची नांवे: गोलकिपर- अनिकेत रघुनाथ पोवार, मयुरेश राजेंद्र चौगुले, राहुल नाना पाटील, कैलास महादेव पाटील, रोहन सुधाकर आडनाईक, ओंकार शिवाजी मोरे, सुमित संजय घाटगे, संकेत नितीन साळोखे, करण रविंद्र चव्हाण-बंद्रे, प्रथमेश विजय हेरेकर, ऋतुराज कुमार सुर्यवंशी, विशाल वसंत पाटील, ऋतुराज शिवाजी संकपाळ, प्रभू सुरेश पोवार, अरबाज जहांगीर पेंढारी, संकेत उमेश जाधव, ऋतुराज चंद्रशेखर पाटील, विशाल वसंत पाटील, रोहीत राजेंद्र पोवार, सतेज संतोष साळोखे, संकेत सचिन मेढे, मार्गदर्शक प्रा. अमर सासने, निखील कदम. संघास संस्थेचे पेट्रन-इन्-चीफ शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले.