no images were found
महाराष्ट्र शासनाकडून नवनीतचे ‘टी आर. (Tr.) फॉर टीचर’ नामानिधान अधिकृत
मुंबई, : नवनीन एज्युकेशन लिमिटेड ही शिक्षणक्षेत्रातील आघाडीची कंपनी राज्यभरातील शिक्षकासाठी आमचे ‘टी आर.’ (Tr.) हे नामानिधान अधिकृत केल्याबद्दल राज्य शासनाचे मनापासून आभार मानते. नवनीतने आपल्या ‘टीआर. फॉर टीचर’ (Tr. For Teacher) या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
नवनीतच्या संकल्पनेतून ‘टीआर. फॉर टीचर’ हा उपक्रम समाजसेवेत योगदान देणाऱ्या इतर व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसारखीच मान्यता आणि आदर देण्याच्या उद्देशाने सुरू झाला आहे. डॉक्टर (डॉ.) किंवा कॅप्टन (कॅ.) अशा प्रकारचे नामानिधान त्यांच्या व्यवसायाची ओळख करून देते. त्याचप्रमाणे नवनीतच्या मते समाजाच्या भविष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांनाही अशीच ओळख मिळणे आवश्यक आहे.
शिक्षक हे अनेकदा आपल्या समाजातील ‘दुर्लक्षित नायक’ ठरतात. ते तरूण मनांना आकार देण्यासाठी आणि वर्गातील शिक्षणाद्वारे त्यांच्यामध्ये मूल्ये रूजवण्यासाठी निःस्वार्थ भावनेने काम करतात. त्यांचे योगदान अमूल्य असते. परंतु त्यांचा कधीही गौरव केला जात नाही. हीच बाब लक्षात घेऊन नवनीनने शिक्षकांच्या अथक प्रयत्नांना प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या मान्यतेचा प्रसार करण्यासाठी ‘टीआर. फॉर टीचर’ हा उपक्रम आणला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून शिक्षकांसाठी ‘टी आर.’ या किताबाची अधिकृत घोषणा हे नवनीतच्या उपक्रमाचे महत्त्व आणि प्रभाव यांचे प्रतीक आहे. हे नामानिधान देऊन शासनाने महाराष्ट्रातील तरूणांच्या भविष्याला आकार देण्यातील शिक्षकांच्या महत्त्वाच्या कार्याचा गौरव करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
नवनीन एज्युकेशन लिमिटेडचे ब्रँडिंग प्रमुख देवीश गाला कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले, “आमच्या ‘टीआर. फॉर टीचर’ उपक्रमाला मंजुरी देण्याच्या आणि शिक्षकांसाठी ‘टीआर.’ ही पदवी मंजूर करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाबाबत आम्ही खूप कृतज्ञ आहोत. हा निर्णय शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा गौरव आणि ओळख देण्याप्रति शासनाच्या योगदानाला अधोरेखित करतो. आमच्या मते हे पाऊल शिक्षकांचा गौरव तर करेलच पण त्याचबरोबर पुढील पिढ्यांना शिक्षण क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रेरणादेखील देईल.”
नवनीत शिक्षणामध्ये योगदान देण्याची आणि तरूण मनांना आकार देण्याच्या शिक्षकांच्या परोपकारी प्रयत्नांमध्ये पाठबळ देण्याचे आपले कार्य सतत पुढे नेत आहे.