no images were found
पाहायला मिळणार अनेक ट्विस्ट्स!
या आठवड्यात प्रेक्षकांना एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मधील कथानकामध्ये अनपेक्षित व रोमांचक ट्विस्ट्स पाहायला मिळतील. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील एपिसोडबाबत राजेश म्हणाल्या, ”कटोरी अम्मा (हिमानी शिवपुरी) राजेशसोबत (गीतांजली मिश्रा) दररोज होणाऱ्या वादविवादांवर आधारित लघुपट तयार करण्याचा सल्ला देतात. दरम्यान, मनोहर (नितीन जाधव) पोलिस स्टेशनच्या बाहेर भांडण करणाऱ्या दोन व्यक्तींना पकडतो. त्यातील एक व्यक्ती हकीकत नाव असलेल्या व्यक्तीवर अस्वस्थ करण्याचा आरोप करतो, कारण हकीकतने भाकीत केलेले असते की त्याच्या गाडीची चारही टायर्स चोरीला जातील, ज्यामुळे त्याला रात्रभर झोप लागत नाही. हकीकत आपली बाजू मांडताना सांगतो की त्याच्यामध्ये सुपरनॅचरल शक्ती आहे, ज्यामुळे तो त्याच्या स्वप्नांमध्ये भविष्यात घडणाऱ्या घटना पाहू शकतो. पण, तो त्याबाबत फक्त कोड्यांच्या माध्यमातून स्पष्टीकरण देऊ शकतो. हसीना त्याच्या या शक्तीबाबत स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करते, पण हप्पू (योगेश त्रिपाठी) त्यांच्यावर संशय घेऊन दोघांना तेथून निघून जाण्यास सांगतो. त्यानंतर, त्यांच्यामधील एक पुरूष परत येऊन हप्पूला सांगतो की त्याच्या गाडीचे टायर्स चोरीला गेले आहेत. मलायका (सोनल पनवार) परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात अयशस्वी ठरलेल्या हप्पूला फटकारते. हप्पू लाजत माफी मागतो. दुसऱ्या दिवशी हकीकत हप्पूला सांगतो की त्याने स्वप्नात हप्पूची पत्नी व आई यांच्यामध्ये जोरात भांडण झाल्याचे पाहिले, ज्यामुळे हप्पू घरी धावत जातो, पण त्याला दोघी भांडताना पाहायला मिळते. हप्पू भितीने हकीकतला त्याच्याबाबत स्वप्न न पाहण्याची विनंती करतो. पण, हकीकत त्याला त्याच्याबाबत पडणाऱ्या स्वप्नांबाबत सांगत राहतो. या सर्वांमधून सुटका करून घेण्यासाठी हप्पू मनोहरला सूचना देतो की हकीकतला झोपायला देऊ नको. पण यामुळे हप्पूच्या समस्यांचे निराकरण होते की नाही हे पाहणे रोचक असणार आहे.” एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील एपिसोडबाबत अंगूरी भाबी म्हणाल्या, ”सक्सेना (सानंद वर्मा) मॉडर्न कॉलनीमधील रहिवाशांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करतो, जेथे विभुती (आसिफ शेख) सोडून सर्वजण शिबिरामध्ये सहभाग घेतात. शिबिरादरम्यान केलेल्या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर रहिवाशांना उच्च मधुमेह, कोलेस्ट्रॉल पातळ्यांमध्ये वाढ, किडनी स्टोन्स असे विविध आरोग्यविषयक आजार असल्याचे निदर्शनास येते. सक्सेना त्यांना फिटनेसकडे लक्ष देण्याचा आणि वजन कमी करण्याचा सल्ला देतो. याकडे पैसे कमावण्याची संधी पाहत विभुती फिटनेस क्लास सुरू करतो आणि जपानमधील प्रतिष्ठित संस्थेकडून त्याबाबत पदवी असण्याचा चुकीचा दावा करतो. पण, सर्व प्रयत्न करून देखील त्याच्याकडे कोणीच नोंदणी करत नाही आणि त्याऐवजी सक्सेनाच्या फिटनेस ट्रेनिंग सेंटरमध्ये जातात. अनिताच्या सांगण्यावरून तिवारी (रोहिताश्व गौड) विभुतीच्या फिटनेस क्लासमध्ये नोंदणी करतो. पण, सत्रादरम्यान विभुती तिवारीच्या मानेवरील चुकीच्या पॉइण्टवर दबाव टाकतो, ज्यामुळे त्याची मान वाकडी होते. यामुळे तिवारीला राग येतो, तसेच अंगूरीसह (शुभांगी अत्रे) सर्वजण त्याची मस्करी करू लागतात. आता प्रश्न असा आहे की, विभुती तिवारीची मान सरळ करू शकेल का?”