no images were found
सोमवारी ए व बी वॉर्डमध्ये पाणी पुरवठा बंद
कोल्हापूर : पुईखडी जलशुध्दीकरण केंद्राकडून येणा-या 1100 मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनला आय.टी.आय.वस्तीगृहाजवळ असणा-या क्रॉस कनेक्शनचे काम सोमवार, दि.15 एप्रिल 2024 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून दैनंदिन होणारा पाणी पुरवठा सोमवारी होऊ शकणार नाही. यामध्ये ए, बी, वॉर्ड मधील पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रावरून शहरांतर्गत येणा-या कळंबा जेल समोरील डॅश ग्रुप, वसंत विश्वास पार्क, एल.आय.सी. कॉलनी, अमरनाथ मंदिर परिसर, बाबुराव साळोखे पार्क, तपोवान, म्हाडा कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स परिसर, नाळे कॉलनी, बापुराम नगर, प्रथमेशनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वे नगर, बुध्दी होळकर नगर, वाल्मिकी आंबेडकर नगर, हस्तीनापुर नगरी, शांती उद्यान, शिवगंगा कॉलनी, श्रीराम कॉलनी, साई कॉलनी, संपूर्ण साळोखेनगर, मोहिते कॉलनी, राजलक्ष्मी नगर, देवकर पाणंद, एन टी सरनाईक नगर, योगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, चव्हाण कॉलनी, मोहिते कॉलनी, गणपती नगर, पार्वती पार्क, भोसले कॉम्प्लेक्स, मल्हार रेसिडेन्सी, शिवप्रभूनगर, मोरेमाने नगर, राणे कॉलनी, राजु गांधीनगर, आक्काताई मानेनगर, महादेव नगरी, जनाईदत्त नगर, विद्या विहार कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर स्टॅड, नविन मोरे कॉलनी, जोशी नगर, विजयनगर, शहाजी वसाहत, संभाजीनगर, शाहू मिल, गंजीमाळ, रामानंदनगर, जरगनगर, रेणुका नगर, आर.के.नगर, गणेश कॉलनी, हनुमान नगर, ज्योतिर्लिंग कॉलनी, रायगड कॉलनी, हॉकी स्टेडीयम परिसर, संदिप बेकरी, बालाजी पार्क, यशवंत कमल पार्क, जाधवनगर, खंडोबा मंदिर, भारत नगर, सौदानगर, सुभाषनगर, वाय.पी.पोवारनगर, मंगळवार पेठ, वारे वसाहत, शाहु बँक परिसर, राम गल्ली, भारत डेअरी परिसर, मंगेशकर नगर, बेलबाग, मंडलिक वसाहत, पाटाकडील तालीम, बजापराव तालीम, जासूद गल्ली, कोळेकर तिकटी, पोवार गल्ली, शिवाजी पेठ, वेताळ माळ तालीम, 8 नंबर शाळा, फिरंगाई गल्ली, टिंबर मार्केट परिसर, कोंडेकर गल्ली, सरदार तालीम परिसर, शहाजी वसाहत, साळोखेनगर टाकीअंतर्गत कणेरकरनगर, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, बीडी कॉलनी, बोंद्रेनगर, राजोपाध्येनगर, बाबा ग्रुप परिसर, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी नगर, हिंदु कॉलनी, सुलोचना पार्क, राधानगरी रोड, क्रशर चौक, मोहिते पार्क, केदार पार्क, देशमुख शाळापरिसर, शिवाली पार्क इत्यादी भागातील नागीकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार, दि.16 एप्रिल 2024 रोजी पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.