
no images were found
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ मालिकेत तारा गरोदर असल्याचे उघड झाल्यावर सूर्यप्रताप च्या संतापाचा उद्रेक
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ ही मालिका 17व्या आणि 21व्या शतकांच्या पार्श्वभूमीवरील प्रेमाची आणि टाइम ट्रॅव्हेलची गोष्ट सांगते. अलीकडच्या भागांमध्ये सूर्यप्रताप (करण व्ही. ग्रोव्हर) बळजबरीने तारा (रिया शर्मा)शी विवाह करण्याचा प्रयत्न करतो.पण फेरे घेतानाच ती मूर्छित होऊन पडते आणि गोंधळ होतो. धक्कादायक घटनाक्रम उलगडत जातो आणि हे उघड होते की तारा गरोदर आहे. सूर्यप्रतापच्या म्हणण्यानुसार एका गरोदर स्त्रीने विवाह विधी करू नये, त्यामुळे त्यांचा विवाह रद्द होतो.
आगामी भागांमध्ये ताराच्या गरोदरपणाची बातमी ऐकून ध्रुव (ईशान धवन) चा आनंद गगनात मावत नाही, तर सूर्यप्रतापचा धीर सुटू लागतो. संतापलेला सूर्यप्रताप कोणत्या थराला जाईल या विचाराने तारा चिंतेत पडते कारण मंडपात त्याचा संतप्त अवतार तिने बघितलेला असतो.ताराने आपल्याला फसवले असे सूर्यप्रतापला वाटते आणि ताराला असे सहजासहजी निसटू न देण्याचा निर्धार तो करतो.
तारा गरोदर असल्याचे कळल्यानंतर सूर्यप्रताप आता काय करेल?
ताराची भूमिका करणारी रिया शर्मा म्हणते, “आगामी कथानक खूप रोचक असणार आहे, कारण सूर्यप्रताप, तारा आणि ध्रुव एका गुंतागुंतीच्या प्रसंगात सापडले आहेत. तारा गरोदर असल्याचा ध्रुवला आनंद झाला आहे, पण तो या परिस्थितीत ताराला हवी तशी मदत करू शकत नाहीये. सूर्यप्रतापच्या रूपात एक बलाढ्य शत्रू तारासमोर उभा ठाकला आहे कारण आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. या संकटातून तारा कशी सुटते आणि आपले बाळ आणि ध्रुव यांना सुरक्षित ठेवून सूर्यप्रतापच्या संतापाला कसे उत्तर देते हे बघणे प्रेक्षकांसाठी रोचक असेल.”
महाराजा सूर्यप्रतापची भूमिका करत असलेला करण व्ही. ग्रोव्हर म्हणतो, “सूर्यप्रताप नेहमी आपल्या मर्जीने वागतो आणि आपल्याला हवे ते कसेही करून मिळवतो. अलीकडेच प्रेक्षकांनी त्याची एक काळी आणि भयंकर बाजू पाहिली आहे. पण आता तर ताराच्या गरोदरपणाची खबर कळल्यानंतरत्याचासंताप नवीन पातळीवर पोहोचला आहे.त्याची आजवर न पाहिलेली बाजू प्रेक्षकांना बघायला मिळेल. त्याची पुढची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.”