Home मनोरंजन ‘वंशज’ मालिकेत युक्तीची धूर्त चाल; कोयल आणि गार्गीमध्ये बेबनाव

‘वंशज’ मालिकेत युक्तीची धूर्त चाल; कोयल आणि गार्गीमध्ये बेबनाव

8 second read
0
0
41

no images were found

वंशज मालिकेत युक्तीची धूर्त चाल; कोयल आणि गार्गीमध्ये बेबनाव

 

सोनी सबवरील वंशज ही मालिका युविकामहाजन (अंजली तत्रारी)भोवती फिरते, जी पारंपारिक कौटुंबिक नियमांना झुगारून कौटुंबिक व्यवसायात गुणवत्तेवर आधारित वारसाहक्काचे समर्थन करून, महाजन साम्राज्यात संघर्ष निर्माण करते. अलीकडच्या भागांमध्ये युक्ती मुलतानी (अंजली तत्रारी) आपली आई भूमी (गुरदीप कोहली) हिला आपण युविकाच असल्याचे सत्य उघड करते. आपल्या कुटुंबाचा आनंद नष्ट केल्याबद्दल आपला भाऊ डीजे (माहिर पांधी) याचा तिला सूड उगवायचा आहे.

आगामी भागांमध्ये कोयल (निशा नागपाल) आणि डीजेच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. अशात युक्ती डीजेच्या सपोर्ट सिस्टमला सुरुंग लावण्याचे ठरवते आणि डीजेची आई गार्गी (परिणिता सेठ) हिच्यापासून सुरुवात करते. युक्ती कोयलला ‘दिल्लीतील तीन सर्वाधिक प्रभावशाली महिला’मध्ये सहभागी होण्यास सांगते, ज्यामध्ये गार्गी तीन वेळा विजेती ठरलेली असते. पण यावेळी कोयल बाजी मारते आणि गार्गीला हरवून स्पर्धा जिंकते. यामुळे गार्गी संतापते. डीजे आईवेडा आहे आणि युक्तीने त्याला स्वतःच्या ताब्यात ठेवले नाही तर भविष्यात तिला जड जाईल असे सांगून ती युक्तीचे कान भरते. कोयल आणि गार्गी यांच्यातील झगडा इतका विकोपाला जातो की, साखरपुड्याच्या समारंभात गार्गी कोयलच्या थोबाडीत मारते आणि विषय संपवते.

युक्ती मुलतानीची भूमिका साकारत असलेली अंजली तत्रारी म्हणते, “युक्तीने पद्धतशीर रित्या डीजेवर मात करून महाजन साम्राज्याचे नियंत्रण आपल्या हाती घेण्याचे मनावर घेतले आहे. भूमीपाशी आपली ओळख उघड करून युक्ती एक मोठा कट रचते आहे. गार्गी, डीजे आणि कोयलचा स्वभाव ओळखून, त्या तिघांमध्ये फाटाफूट निर्माण करून आपला बदला पूर्ण करायचे ठरवते. भूमीला युक्तीची ही पद्धत पसंत नाही कारण ती महाजनांच्या पद्धतीशी साम्य दाखवणारी आहे, हे मत भूमीचे दिवंगत पिता प्रेमराज (अक्षय आनंद) यांनी व्यक्त केलेले असते. पण युक्ती आता मागे हटायला तयार नाहीये. सामर्थ्याचा लढा असाच जिंकावा लागेल असे तिचे मत आहे. गार्गी आणि कोयल यांच्यातील तीव्र वैर उलगडताना अनेक वळणे, आडवळणे घेत ही मालिका प्रेक्षकांना नाट्यमय रोलरकॉस्टरचा अनुभव देईल

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…