no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोल्हापूर (प्रतिनिधी): नॅनो समिश्रे आधारित मटेरियल पासून तयार केलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्टकरण्यासाठी होणारे महत्त्वाचे संशोधन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रा. डॉ. सागर डेळेकर, म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगीचे डॉ. राजेंद्र पाटील, स्वप्नजीत मुळीक व अमोल पांढरे यांनी केले आहे. या संशोधनास जर्मन सरकारचे दोन पेटंट मिळाले आहेत. सुपरपरामॅग्नेटिक लोह ऑक्साईड व चिटोसन लेपित लोह ऑक्साईड नॅनोकणाची त्यांनी व्हिव्हो व्यवहार्यता मूल्यांकन (मूत्रपिंड, गिल्स स्नायू ऊती, मेंदू, आणि यकृत), हे साताऱ्यातील “कावेरी गर्रा” या माशांवरती केले असून हे नॅनो समिश्रे गैर-धोकादायक आणि जैवसुसंगत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संशोधनाचा उद्देश हा आहे की आपण ज्या आजारांना कर्करोग म्हणतो त्या रोगांचे उपचार करण्यासाठी आणि शेवटी बरे करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी पद्धती विकसित करणे हा आहे.विकसनशील देशांना संसाधने आणि पायाभूत सुविधांच्या अडचणींचा सामना करावा लागतो जे वेळेवर ओळख, निदान आणि व्यवस्थापनाद्वारे कर्करोगाचे परिणाम सुधारण्याच्या उद्देशाला आव्हान देतात. तसेच लक्ष्यित थेरपी, हार्मोनल थेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी या उपचार पद्धतीला पर्याय म्हणून मॅग्नेटिक हैपेर्थेर्मियाचा उपचार भविष्यात पारंपारिक पद्धतीना पर्याय असू शकतो. या संशोधनाचा लाभ कर्करोग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकांसह कर्करोग समस्यावर उपाय म्हणून ही होणार आहे. या संशोधनामुळे तयार करण्यात येणारी सुपरपरामॅग्नेटिक लोह ऑक्साईड व चिटोसन लेपित लोह ऑक्साईड नॅनोकण हे सध्याच्या कर्करोग क्षेत्रासाठी अनमोल देणगी देणारी ठरतील, असा विश्वासडॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला. या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल प्रा. डॉ. सागर डेळेकर, डॉ. राजेंद्र पाटील, स्वप्नजीत मुळीक वअमोल पांढरे यांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी अभिनंदन केले.