no images were found
शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त
कोल्हापूर(प्रतिनिधी ) – शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर, दोन्ही देशातील संशोधकांना संशोधनातील नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठ यांच्यामध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प मंजुर झाला असून त्या अनुषंगाने मिड स्विडन विद्यापीठाचे प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड, संशोधक डॉ.मनिषा फडतारे व रोहन पाटील यांनी प्रकल्पाअंतर्गत पुढील नियोजनासाठी 19 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी, दोन्ही विद्यापीठांमधील या महत्वपूर्ण संशोधन प्रकल्पाच्या वाढीसाठी शिवाजी विद्यापीठ सहकार्य करेल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी दिली. बैठकीस प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, डॉ.सरिता ठकार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ.सागर डेळेकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे डॉ.शिवाजी सादळे, डॉ.कैलास सोनवणे, डॉ.अनिल घुले, डॉ.चंद्रकांत लंगरे, नॅक विभागाचे डॉ.सुभाष माने आदी उपस्थित होते. युसिक अधिविभागप्रमुख डॉ.ज्योतीप्रकाश यादव यांनी प्रकल्पाचा उद्देश आणि स्वरूप याची माहिती दिली.