
no images were found
न्यू पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांची निवड
उंचगाव 🙁 प्रतिनिधी )श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत ट्रेनी इंजिनिअर या पदावर ऑन रोल निवड झाली. प्रथमेश नलवडे, निखिल माळी, श्रेयस बासापुरे व आदित्य मोहिते या विद्यार्थ्यांची ‘Wilo Mather and Platt Pumps Pvt. Ltd.’ या कंपनीत निवड झाली. या विद्यार्थ्यांना वार्षिक वेतन पहिल्या वर्षी 2.76 लाख आणि दुसर्या वर्षी रू. 3 लाख मिळणार आहे. तर रोहीत माने याची ‘TATA Motors Pune’ या कंपनीत निवड झाली. सदरचे इंटरव्ह्यू न्यू पॉलिटेक्निकमध्ये पार पडले होते. या इंटरव्ह्यूसाठी ट्रेनिंग प्लेसमेंट व काॅर्पोरेट रिलेशन्स ऑफीसर प्रा. किरण वळीवडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर विद्यार्थ्यांना मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील आणि प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.