no images were found
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होण्यास उपयुक्त सॉफटवेअर बनविण्यात यश
इचलकरंजी (प्रतिनिधी) – डीकेटीईच्या अर्टिफिशियल इंटेलीजन्स इंजिनिअरींग विभागात शिकणारे विद्यार्थी मृणाली कांदेकर, प्रतिक खंदारे, अथर्व अंकलखोपे आणि योगेश कल्याणी यांनी प्रा.सौ. डी.एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मातीचे परिक्षण करुण त्यातील घटक ओळखता येतील‘ यावर अधारीत शेतक-यांना उपयुक्त अशे सॉफटवेअर बनविले आहे. सध्या शेतक-यांना शेती करण्यासाठी माती परिक्षण हा महत्वाचा भाग समजला जातो माती परिक्षणावर शेतक-याचे संपूर्ण पीक अवलंबून असते यासाठी शेतक-यांना मदत व्हावी या उददेशाने डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी माती परिक्षणावर आधारीत सॉफटवेअर बनविले आहे.
या सॉफटवेअरमुळे मातीतील अनेक घटक जसे की, पोटॅशिएम, फॉस्फरस, नायट्रोजन यांचे प्रमाण किती आहे हे ओळखून मातीचा पीएच चेक करता येतो त्यामुळे शेतीच्या उत्पादनाचा अंदाज, कोणकोणती विविध उत्पादने घेता येतील याचा अंदाज बांधण्यास शेतक-यांना मदत होवून योग्य तो निर्णय घेणे सोपे होईल आणि मातीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करता येईल.
आपल्या मातीतील घटकांची माहिती शेतक-यांना मिळाल्यामुळे त्या त्या घटकाला उपयुक्त अशी पिके घेण्यास शेतक-यांना मदत व फायदाच होईल त्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशाची बचत होईल. अर्टिफिशियल इंटेलीजन्स च्या प्रकल्पात या विद्यार्थ्यांनी वापरलेल्या शोधात्मक अल्गोरिदम आणि मॉडेल्सच्या सहाय्याने आजच्या काळात नैसर्गिक संसाधनांचा उत्कृष्ट पध्दतीने वापर करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचे योगदान अतिशय महत्वाचे ठरत आहे.
डीकेटीई मधील विद्यार्थी दरवर्षी समाजासाठी उपयुक्त असे अभिनव व नाविण्यपूर्ण असे प्रकल्प/प्रोजेक्ट विकसित करत असतात. संस्थेच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी आपला अंतिम वर्षातील प्रोजेक्ट निवडताना प्राधान्याने लोकांच्या दैनंदीन जीवनात येणा-या अडचणी समजावून घेवून त्यावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाधानकारक उपाय योजना तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी सॉफटवेअर तयार केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांस संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे,विभा
फोटो ओळी – डीकेटीईमध्ये ए.आय. विभागात बनविण्यात आलेल्या शेतीसाठी उपयुक्त सॉफटवेअर सोबत विद्यार्थी व मार्गदर्शक.