
no images were found
आत्तापर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेत 324 ठिकाणी 1.10 लक्ष नागरिकांची उपस्थिती
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेची सुरुवात जिल्ह्यात झाली असून या अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत राधानगरी, शिरोळ, चंदगड, कागल, हातकणंगले, शाहूवाडी, करवीर, भुदरगड, पन्हाळा, आजरा, चंदगड व गगनबावडा अशा 12 तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दीनदयाल अंत्योदय या योजनांसह 39 योजनांचा समावेश आहे. जिल्हयात ग्रामीण भागातील 324 ठिकाणी झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात 31045 नवीन पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांतून लाभ वितरीत करण्यात आला आहे. जिल्हयात 1025 ग्रामपंचायतींमधे कार्यक्रमाचे आयोजन सुरू असून 26 जानेवारीपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार आहेत.
या संकल्प यात्रे अंतर्गत सुरक्षा बीमा योजनेच्या एकूण 615 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. जीवन ज्योती योजनेचा लाभ 505 लाभार्थ्यांना, आरोग्य शिबीराचा लाभ 9299 लाभार्थ्यांनी घेतला आहे. जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या 505 आहे. पीएम उज्वला योजनेच्या लाभासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांची संख्या 664 आहे. क्षयरोगासाठी तपासणी केलेल्या लोकांची संख्या 8975 आहे. सिकलसेल तपासणी केलेल्या लोकांची संख्या 1752 आहे. या व्यतिरीक्त नैसर्गिक शेती करणाऱ्या 117 शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांचे मनोगत मेरी कहानी मेरी जुबानी एकूण 332 लाभार्थ्यांच्या नोंदविला गेला.