no images were found
बालकल्याण संकुलातील विवाहीत महिलांचे दादांनी केले माहेरपण
कोल्हापूर :नामदार चंद्रकांतदादा पाटील सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमातून समाजातील प्रत्येक घटकाशी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम हाती घेत असतात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज कोल्हापूर या ठिकाणी माहेर वासीन कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापूर येथील बाल संकुल केंद्रातून विवाह होऊन गेलेल्या महिलांचे एकत्रीकरण करून
आज नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी 25 महिला त्यांची मुले यांना दोन दिवसांची कोकण सहल आयोजित केली तसेच त्यांना साडीचा आहेर करण्यात आला. आपली बहिण माहेरी सुट्टीसाठी आल्यावर ज्यापद्धतीने एक भाऊबहिणीचा मान सन्मान राखतो तसा आज मान सन्मान आम्हाला मिळाला अशी भावना या भगिनींच्या कडून व्यक्त करण्यात आली.मिरजकर तिकटी या ठिकाणी सर्व महिलांचे एकत्रीकरण करून या महिलांची सहल आज कोकण सहल रवाना झाली.
या पूर्ण सहलीसाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे बहुमोल सहकार्य झाले.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय अग्रवाल, व्ही बी शेटे, स्वप्नील शेटे शुभांगी चौगले, शिरीष बोगार, वैशाली भोसले, अंजली वाघमारे, समीक्षा गायकवाड आदी उपस्थित होते.