Home सामाजिक हेल्मेटसक्ती बाबत प्रशासनाने जनसंवाद करावा … पवार

हेल्मेटसक्ती बाबत प्रशासनाने जनसंवाद करावा … पवार

0 second read
0
0
36

no images were found

हेल्मेटसक्ती बाबत प्रशासनाने जनसंवाद करावा … पवार

कोल्हापूर :(प्रतिनिधी )आज अनेक प्रकारच्या सुधारणांची गरज असताना प्रशासनाचे नैमित्तिक निर्णय जनतेकरीता आवश्यक आहेत की नाही याचा सर्वकष योग्य निर्णयाप्रत नसताना सुद्धा प्रशासनानं सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आधार घेत कोल्हापुरामध्ये टप्प्याटप्प्याने हेल्मेट सक्ती राबवायला सुरू केलेली आहे … खराब रस्ते, निकृष्ट डांबरीकरण, वाहनांचा वेग, पावसाळ्यातल खड्डेपूर , अनावश्यक उभारलेले स्पीड बेकर्स, वाहतुकीला शिस्त नसत कुठलाही बोळातन कशीही येजा करणारी रहदारी, अस्ताव्यस्त पार्किंग ,उभं आडवं पसरलेलं कोल्हापूर व पर्यटनाच्या नावाखाली वाहतुकीचा बोजवारा उडवत सपशेल अपयश आलेलं म्हणजे आपल कोल्हापूर ही साधीसुधी व्याख्या असताना आता कोल्हापुरात पुन्हा एकदा प्रशासनाने सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची अवलंब करत हेल्मेटसक्ती करण्याच ठरवलेलं आहे ..प्राथमिक पातळीवरती आज सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता मर्यादितरित्या लोकांना केलेली ही हेल्मेट सक्ती उद्या टप्प्याटप्प्याने सामान्य नागरिकाच्या डोक्यावर बसली जाईल हे नक्की ..वस्तूता कुठल्याही निर्णयाला जनसंवाद अथवा जनजागृती आवश्यक असते… ती गोष्ट रुजवण्यापेक्षा पटवणं यावर प्रशासनाचा भर असला पाहिजे.. उलट कुठल्यातरी वरिष्ठांच्या कडून एक लाख हेल्मेट खपवायचं एखाद्या गुजराती कंपनीच कंत्राट कोल्हापूरच्या प्रशासनाला कोणी दिले का ??? अशी भावना आणि कल्पना या हेल्मेट सक्तीच्या निर्णयातून जनतेची झालेली आहे.. आज कुठलाही रस्ता बंद करायचा असला अथवा रस्ता.. वनवे.. करायचा असला तरीसुद्धा त्यासंबंधीच्या हरकती प्रशासनाकडुन वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्या जातात… लोकांच्या भावनांचा आदर घेऊन लोकांचा विचार लक्षात घेऊन सदरच्या गोष्टीबद्दल कार्यवाही प्रशासन करावी. परंतु या शहरान यापुर्वी बहुमताने आणी प्रचंड इर्षेनं व प्रचंड सहकार्याने एकीन आणी प्रचंड समूहानं एकमुखी नाकारलेली हेल्मेट सक्ती पुन्हा शासनाने लोकांच्या बोकांडी बसवण्याचं ठरवलेलं आहे… वस्तुतः लोकांच्या सुरक्षेच्या करता हेल्मेट आवश्यकच आहे.. हे आम्ही कधीही नाकारत नाही.. किंबहुना हेल्मेट वापरणं गरजेच आहे.. हेही नाकारता येणार नाही.. परंतु मुंबई , पुणे , नागपूर, नाशिक ,यासारख्या शहरांमध्ये तेथील प्रशासनाने दिलेल्या सुविधा याचा विचार सर्वप्रथम हा विचार या पाठीमागे करावा असा प्रशासनाला वाटत का नाही ..याचं मात्र आश्चर्य वाटतं. कुठलीही गोष्ट ही जनसंवादातून निर्माण व्हावी त्याला लोकांचा पाठिंबा मिळाला .. मग त्याची त्या वापराच्या बदल मग सक्ती नावाचा शब्द प्रशासनाला वापरावा लागत नाही.. आज हेल्मेट सक्ती बरोबर हेल्मेट न वापरण्याचा दंडाच्या पावतेही प्रशासनाने छापून ठेवला असतील एवढी गडबड या हेल्मेट सक्तीची प्रशासनाला झालेली आहे ..या निवेदनाद्वारे आम्ही प्रशासनाला सुचवू इच्छितो की हेल्मेट सक्ती जशी गरजेची आहे तशी कोल्हापुरात त्याच बरोबर ईतर सुधारणा खूप गरजेचे आहेत.. आणी हेच लोकांच्या कडून ऐकून घेण्याकरता एक जनसंवाद आयोजित करावा.. आणि मग हेल्मेटची सक्ती करावी …शासनाला व प्रशासनाला सातत्याने सहकार्याची शिवसेनेची भूमिका आजवर राहिलेली आहे यापुढेही राहणार आहे . जनतेने देखील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी वावरताना नेहमी शासनाच्या व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाद्वारेच वागाव अशी आमची भूमिका आहे व राहणार देखील.. तरी देखील हेल्मेट सक्ती बाबत जनसंवाद आयोजित करून लोकांची मत विचारत घेऊन शासनाने त्याच्यावर निर्णय घ्यावा… निव्वळ कोणालातरी एकाला वाटते तेव्हा कुठल्यातरी एखाद्या हेल्मेट खपवायचे आहेत म्हणून शहरातल्या दहा लाख नागरिकांना वेठीस धराव ही बाब शिवसेना कदापिही सहन करणार नाही… आलं मनावर घाल डोक्यावर…. ही भूमिका न खपवता शिवसेना यासंदर्भात व्यापक लढा उभा करेल …परंतु त्याआधी प्रशासना देखील जनतेच्या संवादाद्वारे हेल्मेटची जनजागृती करत असताना त्याच्या भूमिका पटवून घ्याव्यात आणी लोकांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात आणी यासाठी प्रशासनाची तयारी असेल तर जनसंवाद आयोजित करायला शिवसेना तयार आहे.. कृपया याचा विचार प्रथम करावा ..व आज ठराविक एखाद्या वर्गापुर्ती केलेली हेल्मेट सक्ती ही सर्वच लोकांना करण्यापूर्वी या जाचक जुलमी व अन्यायकारक शब्दांनुसार जनतेचा उद्रेक प्रशासनाबाबत होऊ नये याची काळजी प्रशासनान घ्यावी. जनतेच्या प्रश्नाकरता उभा राहणाऱ्या उद्धवजींच्या शिवसेनेला मात्र त्यावेळेला प्रशासनाविरुद्ध विविध पातळ्यावरून हेल्मेट सक्ती रद्द करण्यासंबंधी शासनाला भाग पडावा लागेल हे नक्की …. शेवटी लोकांच्या आवश्यक असणाऱ्या अडचणी दूर करून लोकांची सुरक्षितता लोकांना हवी असेल त्या पद्धतीने प्रशासना करावी हेच आमचे मत आहे… ती कुणावर लादावी असं नाही… आणि हे आम्ही होऊन देणार नाही… सदरची निवेदन देताना संजय पवार,विजय देवणे, रविकिरण इंगवले, रवी चौगुले, मंजित माने, धनाजी दळवी, रघुनाथ टिपूगडे, संजय जाधव, सुहास डोंगरे, लतीफ शेख, विराज ओतरी,दिनेश साळोखे, शोनक भिडे, राहुल माळी, सुनील कानूरकर, असिफ अत्तार, अरुण साळोखे, दत्ताजी टिपूगडे, दीपाली शिंदे, प्रीती क्षीरसागर,सुशील भांदीगिरे,राजू जाधव,विशाल सूर्यवंशी,राजू यादव,प्रशांत भोसले,दिनेश परमार,चंदू भोसले,दत्ता फराकटे,विनायक केसरकर, सागर साळोखे,ओमकार पाटील आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…