Home मनोरंजन आँगन अपनों का’ या मालिकेत अश्विन कौशल ची एन्ट्री

आँगन अपनों का’ या मालिकेत अश्विन कौशल ची एन्ट्री

13 second read
0
0
28

no images were found

आँगन अपनों का’ या मालिकेत अश्विन कौशल ची एन्ट्री

 

सोनी सबवरील आँगन अपनों का ही एक कौटुंबिक मालिका, जी जयदेव शर्मा(महेश ठाकूर) या एकल पित्याची आणि तन्वी(अदिती राठोड), दीपिका(नीता शेट्टी) आणि पल्लवी(आयुषी खुराना) या आपल्या तीन मुलींवरील त्याच्या बिनशर्त प्रेमाची हृदयस्पर्शी कथा सांगते. सध्याच्या कथानकात पल्लवी जयदेवने ‘आँगन’चे घर गहाण ठेऊन 50 लाख रुपयांचे कर्ज घेण्यामागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या आव्हानांमध्ये भर म्हणून, पप्पी मेहरा(अश्विन कौशल) या धूर्त रियल इस्टेट एजंटचे आगमन अवस्थी आणि शर्मा कुटुंबियांना धोका निर्माण करते आणि पल्लवीच्या अडचणी वाढतात.

 

नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अश्विन कौशल, पैशांसाठी हपापलेल्या पप्पी मेहराची भूमिका साकारत आहे. तो अतिशय चलाख आणि पैशांसाठी कोणत्याही थराला जाणारा पंजाबी व्यापारी आहे, जो केवळ मालमत्ताच नाही तर ज्यातून त्याला पैसा मिळवता येईल अशा प्रत्येक गोष्टीचा व्यवहार करतो. या मालिकेतील त्याच्या आगमनाने गोंधळ माजेल, कारण तो अवस्थी आणि शर्मा कुटुंबाला फसवण्याच्या हेतूनेच येत आहे. पल्लवी, पप्पी मेहराच्या फसवाफसवीच्या कृत्यांपासून दोन्ही कुटुंबांचे रक्षण करण्यासाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तिच्यासाठी तो सगळ्यात मोठा धोका बनेल.

 

पप्पी मेहरा ही व्यक्तिरेखा साकारत असलेला अश्विन कौशल म्हणतो,“एक उत्कृष्ट संकल्पना असलेल्या या विलक्षण मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे. या मालिकेतील मला सर्वात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे माझी पप्पी मेहरा ही व्यक्तिरेखा. माझा कल नेहमीच नकारात्मक भूमिकांकडे असतो, कारण त्या मला सहज जमतात. या व्यक्तिरेखेतील वैविध्य आणि खोली मला सगळ्यात जास्त आकर्षित करते. मला नकारात्मक भूमिका साकारायला आवडते आणि ही व्यक्तिरेखा तर मालिकेमध्ये घटनांचे वादळ आणते. त्याच्या आगमनाने पल्लवीच्या संघर्षाला गंभीर धोका निर्माण होतो आणि अशी अनेक कलाटण्यांनी भरलेली मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच उंचावेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …