Home मनोरंजन परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चा १ मेला प्रदर्शित

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चा १ मेला प्रदर्शित

3 min read
0
0
23

no images were found

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमाचा  मेला प्रदर्शित

 ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चा टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला. महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे ‘नाच गं घुमा’ चर्चेत असताना या आकर्षक अशा टीझरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी ‘नाच गं घुमा’मध्ये अभिनयाची जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. स्त्रीत्त्वाला वाहिलेला हा चित्रपट कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे.

मुक्ता आणि नम्रता यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे,  सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि  बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या  चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या संपूर्ण वितरणाची जबाबदारी ‘पॅनोरमा स्टुडीओज’ने स्वीकारली आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कमावली बाई असते…’ अशा आशयाच्या वाक्यांनी सुरु होणाऱ्या या टीझरमध्ये मग घरची मालकीण आणि घरातील मोलकरीण यांच्यात नेहमीचेच, घराघरात अनुभवाला येणारे, खुमासदार, रंजक संवाद झडतात. ते एवढे  खिळवून ठेवतात की, ‘हे काहीतरी वेगळे आहे,’ याची प्रचीती प्रेक्षकाला येवून जाते. फोनवर बोलणाऱ्या मोलकरणीवर म्हणजे आशाताईवर घरातील गृहिणी रागावते, पुढे उशिरा कामावर येण्यावरून या दोघींमध्ये वाद होतो. त्याला प्रत्युत्तर देतना आशाताई ‘बस नाही भेटली…रस्त्यात अॅक्शीटंट झाला होता ..’ अशी कारणे सांगतात. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या दमदार अभिनयाची चुणूक या टीझरमध्ये दिसून येते.

तुमच्यामुळे  भोपळा गेला कचऱ्यात..’ म्हणून आशाताईना मालकीण झापते तेव्हा ती त्यांना ‘माणूसच आहे मीपण, विसरणार ना,” असे उत्तर देते. पुन्हा ‘तुम्ही नाही का पाकीट विसरला होतात,’ अस युक्तिवाद करते. त्यावर मालकीण बाई रागावतात आणि  ‘माझी बरोबरी करता तुम्ही,” म्हणून कातावतात… अशा छोट्या छोट्या खुमासदार आणि रंजक प्रसंगांनी हा टीझर नटलेला  आहे. एका प्रसंगात या आशाताई मालकिणीच्या नवऱ्याने ‘थँक यू आशाताई’ म्हटल्यावर ‘गो तू हेल’ म्हणतात. असा हा टीझर पाहिल्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता चाळवते. टीझरमध्ये शेवटी एक वाक्य येते, “तिसरे महायुद्ध झाले ना, तर ते कामवाल्या बाईंमुळे होईल, हे लिहून ठेवा.”

आतापर्यंत प्रकाशित झालेल्या पोस्टर, गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत रसिकांना चित्रपटाच्या कथेचा पोत ध्यानात आला आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होतोय, याची आम्ही वाट पाहतोय अशा प्रतिक्रिया आमच्याकडे यायला लागल्या आहेत. स्वप्नील जोशी म्हणतात.दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की सगळ्यांना ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. “महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्यामोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. बायकांच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर, गमती-जमतींवर चित्रपट बेतला आहे,”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …