no images were found
नेहा जोशी आणि आशुतोष कुलकर्णी यांनी सांगितले त्यांच्या गुढीपाडवा साजरा करण्याच्या योजनांबाबत!
महाराष्ट्रीयन सण गुढीपाडवाआनंदमय उत्सव आहे, जो मराठी नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो आणि घराघरांमध्ये सौभाग्य व समृद्धी घेऊन येतो. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मधील कलाकार नेहा जोशी (कृष्णा देवी वाजपेयी) आणि आशुतोष कुलकर्णी (कृष्णन बिहारी वाजपेयी) यंदा गुढीपाडवा साजरा करण्याच्या त्यांच्या योजनांबाबत सांगत आहेत. कृष्णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी गुढीपाडवा साजरा करण्याच्या त्यांच्या योजनांबाबत सांगताना म्हणाल्या, ”गुढीपाडवा साजरा करण्यासह आम्ही आमच्या परंपरांचा सन्मान करतो आणि प्रियजनांसोबत गोड आठवणी तयार करतो. आम्ही पहाटे लवकर उठून घराबाहेर गुढी उभारतो, जी आकर्षक फुलांचे हार, कडुनिंबाची पाने व आकर्षक कपड्यासह सजवली जाते. गुढी समृद्धता व नवीन शुभारंभाचे प्रतीक आहे, ज्यामधून आम्हाला भावी आयुष्यासाठी प्रेरणा मिळते. घरामध्ये, आम्ही उत्सवानिमित्त सजावट करतो, आमच्या घरांच्या अंगणात आकर्षक रांगोळी काढतो, संपूर्ण घरामध्ये फुलांची सजावट करतो, सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते, जे गुढीपाडवा सणाच्या साराशी पूरक असते. यंदा गुढीपाडवा सण आमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. मी आणि माझे सह-कलाकार आशुतोष (कृष्णन बिहारी वाजपेयी) अयोध्येला जाऊन जगप्रसिद्ध श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाचे दर्शन घेणार आहोत. मी यंदा गुढीपाडव्याला माझी आई बनवणारी पारंपारिक स्वादिष्ट मिष्टान्ने जसे पुरणपोळी, श्रीखंड, आंबे डाळ व सुंठ पाक मिस करणार असले तरी अयोध्यामध्ये बदामी पूरी व सब्जी, जिलेबी, खीर व रबडी अशा स्थानिक पाककलांचा आस्वाद घेण्यास उत्सुक आहे. गुढीपाडव्याचे माझ्या मनात खास स्थान आहे, या सणाचे सांस्कृतिक महत्त्व असण्यासोबत सणाशी संबंधित काही गोड आठवणी व परंपरा आहेत. मी श्रीराम मंदिर दर्शनासह यामध्ये अधिक उत्साहाची भर करण्यास उत्सुक आहे.”
आशुतोष कुलकर्णी ऊर्फ कृष्णन बिहारी वाजपेयी म्हणाले, ”महाराष्ट्रात गुढीपाडवा सण उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंब घरामध्ये हार, कडुनिंबाची पाने व आकर्षक कपड्यासह सजवण्यात आलेली गुढी उभारतात. ही गुढी दुष्ट शक्तींपासून संरक्षण करण्याचे प्रतीक मानली जाते आणि घरामध्ये समृद्धता व भाग्य घेऊन येते. हा सण नवीन शुभारंभ, आशा व महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. आम्ही अमाचा सांस्कृतिक वारसा जपत पारंपारिक महाराष्ट्रीयन पेहराव करतो. माझी पत्नी आकर्षक नऊवारी साडी नेसते, तर मी कुर्ता-पायजमा घालतो. पण, यंदा मी वेगळ्याप्रकारे गुढीपाडवा सण साजरा करणार आहे. मी या दिवशी मालिकेमधील माझी भूमिका कृष्णन बिहारी वाजपेयीचा पेहराव करणार आहे आणि अयोध्यामध्ये असणार आहे. माझ्यासोबत मालिकेमध्ये माझी पत्नी कृष्णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी सोबत असणार आहेत. आम्ही अयोध्यामध्ये जाऊन भगवान श्रीरामाचा आशीर्वाद घेणार आहोत, तसेच आमच्या मालिकेला यशस्वी करण्यासाठी देवाचे आभार मानणार आहोत. आम्ही रामनवमी सणाचा आनंद घेणार आहोत, दिवसभर परंपरा जपत, प्रार्थना करण्यासह चाहत्यांसोबत उत्सवी धामधूमीचा आनंद घेणार आहोत. सर्वांना गुढीपाडव्याचा आनंदमय शुभेच्छा!”