no images were found
सीरत कपूर आणि येशा रूघानी यांच्या मैत्रीचे कौतुक होत आहे ‘रब से है दुआ’च्या सेटवर
झी टीव्हीवरील ‘रब से है दुआ’ नातेसंबंध आणि सामाजिक नियमांच्या नाजूक पैलूंच्या अवतीभवती फिरणाऱ्या आपल्या लक्षवेधी कथानकासह प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे. ह्या मालिकेमध्ये नुकतीच मोठी झेप घेण्यात आली आणि त्यातील व्यक्तिरेखा आणि कथानक यांमध्ये नवीन स्तरांची भर पडली. प्रकाशाचा झोत आता मन्नत आणि इबादत यांच्यावर असून त्यांच्या भूमिका अनुक्रमे सीरत कपूर आणि येशा रूघानी यांनी साकारल्या आहेत. ह्या मालिकेतील नाट्य निश्चितपणे अधिकाधिक गडद होत जाणार असून प्रेम, कुटुंब आणि परस्परविरोधी विचारधारांमधून यातील व्यक्तिरेखा मार्गक्रमणा करत आहेत.
ह्या मालिकेने ह्या दोघींना अतिशय व्यस्त ठेवले असून चहलपहल असलेले सेट आणि व्यस्त वेळापत्रकांमधूनही येशा आणि सीरत सेटवर आणि सेटच्या बाहेरही एकमेकींसोबत अतिशय चांगला समय व्यतीत करतात. त्यांच्यातील नाते त्यांच्या ऑनस्क्रीन व्यक्तिरेखा आणि त्यांच्या नात्यापुरते मर्यादित नाही. केवळ सहकलाकारांपासून आता त्या घनिष्ठ मैत्रिणी बनल्या असून ब्रेक्समध्ये मस्त मजा करतात. एकत्र जेवणे तर त्यांच्यासाठी सवयच बनली आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्यातील मैत्री अधिकाधिक दृढ बनत चालली आहे. त्यांच्या मैत्रीतून त्यांच्या व्यक्तिरेखांमधील ऊब आणि नाते खरोखरीच दिसून येते आणि त्यामुळे ‘रब से है दुआ’ मालिकेत त्यांच्या ऑनस्क्रीन नात्यातही तो खरेपणा दिसून येतो. आपल्या ह्या अढळ मैत्रीसह त्या सेटवरील बेस्ट फ्रेंड्स बनल्या असून त्या गोष्टीचे प्रत्येक क्रू सदस्य तारीफ करत आहे.
सीरत कपूर म्हणाली, “येशासोबत काम करणे हा माझ्यासाठी सुंदर आशिर्वाद आहे. आमचे ऑफस्क्रीन नाते इतके छान आहे की त्यामुळे आम्हांला आमच्या व्यक्तिरेखासुद्धा अगदी वास्तविक आणि आपल्याशा वाटाव्यात अशा बनवायला मदत होते. येशा माझ्यासाठी फक्त एका सहकलाकारापेक्षा अधिक आहे. ती माझी सेटवरील पार्टनर इन क्राईम, माझी जीवलग मैत्रीण आहे जिच्यासोबत मी काहीही बोलू शकते. आम्ही एकत्र जेवतो, ते क्षण आमच्यासाठी खरोखरीच आनंद, सहकार्य आणि एकमेकींसाठी समर्थनाचे असतात. एकत्रितपणे आम्ही दोघी फक्त अभिनेत्री नाही तर जीवाभावाच्या बहिणीच आहोत, आणि ‘रब से है दुआ’ मध्ये आपापल्या व्यक्तिरेखांसह प्रेम, आनंद आणि अढळ मैत्रीसोबत मार्गक्रमणा करत आहोत.”
येशा आणि सीरत यांचे नाते ऑफस्क्रीन फुलत असताना मन्नत आणि इबादत यांचा प्रवास ऑनस्क्रीन उलगडत आहे आणि प्रेक्षकांना त्यांच्या टीव्ही स्क्रीन्सना खिळवून ठेवत आहे.