no images were found
महिला भगिनींनी आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक – कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के
कोल्हापूर – आज, सर्व क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर असून त्यांचे कार्य आदर्शवत आहे. धावपळीच्या जीवनामध्ये वावरताना महिला भगिनींनी आपल्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील कै. श्रीमती. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि बेटी बचाओ अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये बचत गटांकडून स्वयंसहाय्यतेकडे या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होती. कार्यशाळेस संबोधित करताना कुलगुरू डॉ.शिर्के बोलत होते. कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी प्रास्ताविक प्रा. डॉ भारती पाटील, समन्वयक, कै. श्रीमती. षारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांनी केले तसेच पाहुण्यांचा परिचय बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. पी. बी. देसाई यांनी केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील,
उपकुलसचिव वित्त विभागाच्या श्रीमती प्रिया देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, डॉ. पी. टी. गायकवाड, तसेच मा. वि. म.चे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, हे उपस्थित होते. यावेळी श्रीमती सुहासिनी पाटील, श्रीमती. प्रिया देशमुख, डॉ. पी. टी. गायकवाड आणि श्री. सचिन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ही कार्यशाळेचे कामकाज चार सत्रांमध्ये पार पडले. पहिल्या सत्रामध्ये डॉ. प्रतिभा देसाई यांनी बेटी बचाओ अभियानाबद्दल माहिती दिली. दुसऱ्या सत्रामध्ये स्त्री पुरूष समतेचे भान या विषयावर डॉ. भारती पाटील यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये अंधश्रध्दा आणि स्त्रिया या विषयावर श्री. कृष्णात स्वाती
यांनी प्रात्यक्षिकांसह महिलांशी संवाद साधला. चौथ्या सत्रात स्त्रियांमधील आर्थिक साक्षरता या विषयावर डॉ. राजन पडवळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वेगवेगळया बचत गटातील महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या तसेच शिवाजी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, रोजंदारी लेखनिक महिलांनी देखील मोठया प्रमाणात उपस्थित दर्शवून उत्सफुर्तपणे सहभाग घेतला. सूत्रसंचालन तेजस्विनी भोसले यांनी केले.