
no images were found
कबीर हा गुढ आणि भक्तीवादी कवी – डॉ. अनिल गवळी
कबीर हा गुढ आणि आणि भक्तीवादी कवी आहे असे प्रतिपादन डॉ. अनिल गवळी यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमालेतील कबीर -माणूस आणि कवी या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कबीर हे भारतीय कवी परंपरेतील श्रेष्ठ कवी आहेत. त्यांच्या कवितेमधून जीवनाविषयी भाष्य पहायला मिळते. तसेच त्यांनी तुकाराम आणि कबीर यांच्या कवितेतील साम्यस्थळांचीही मांडणी केली. सामान्य माणूस ते कवी असा कबीरांच्या जीवनाचा प्रवास व्याख्यानामधून उलगडून दाखवला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये कबीरांच्या कवितांचा वेग वेगळया अंगाने कसा शोध घेता येतो याची मांडणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले, तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. गोमटेश्वर पाटील, प्रा. संतोष बाबर, विभागातील संशोधक विद्यार्थी, एम.ए. चे विद्यार्थी मोठया संख्येन उपस्थित होते.