
no images were found
राज ठाकरेंना भाजपाकडून विशेष भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात तेथील भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. पक्ष बांधणीच्या कार्यात व्यस्त असलेल्या राज ठाकरे यांना भाजपाकडून एक विशेष भेट स्वरुपात एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करुन दिलं आहे. त्यासोबत राष्ट्रध्वजाचं एक चिन्हंही आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींचं रेकॉर्डेड भाषण ऐकू येतं.
चंद्रपूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांना भाजपा नेते आणि राज्याचे वने, सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी ही खास भेट दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंना एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करुन दिलं आहे. शिवाय सोबत राष्ट्रध्वजाचं एक चिन्हंही आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींचं रेकॉर्डेड भाषण ऐकू येतं. राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना अनेक भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. नागपुरात नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. तसेच दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही त्यांनी भेट घेतली. दरम्यान मनसेच्या पुनर्बांधणीविषयीच्या महत्त्वाच्या घोषणाही त्यांनी यावेळी केल्या.