no images were found
कोल्हापूरमध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री. डी. बी. पाटील फौंडेशन सेंटर
कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री. डी. बी. पाटील सर यांच्या कार्याच्या प्रेरणेतून कोल्हापूरमध्ये गजानन महाराज नगर येथे फौंडेशन सेंटर सुरु होत आहे. जेईई, नीट, सीईटी, आयआयटी एन. डी. ए. आणि ऑलिंपियाडस सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी विदयार्थ्यांना शालेय जीवनापासूनच करता येईल. डी. बी. पाटील सर यांच्या नावाने यावर्षी पासून स्कॉलरशिप सुरु करण्यात येणार आहे. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विदयार्थ्यांना ‘ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री. डी. बी. पाटील फौंडेशन सेंटर’तर्फे मार्गदर्शन केले जाईल. यावर्षी इ. ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेऊन तालुकास्तरीय पहिल्या ३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येईल. सेंटरमार्फत विशेषतः फिजिक्स या विषयाचे मार्गदर्शन, अकरावी, बारावी, नीट व जेईईच्या विदयार्थ्यांना तज्ञ शिक्षकांकडून दिले जाणार आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री. डी. बी. पाटील सर यांचे चिरंजीव श्री. राजेंद्र पाटील व स्नुषा सौ. सविता राजेंद्र पाटील यांचेतर्फे हे सेंटर सुरु करण्यात येत असून शालेय विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. सविता पाटील यांनी आवाहन केले आहे.
यावेळी राजेंद्र पाटील, सचिन कुलकर्णी, अग्निपथ जोशी, संतोष पाटील उपस्थित होते.