no images were found
‘वागले की दुनिया’ मालिकेत टेडी बेअरच्या रहस्यमय पार्सलमुळे साई दर्शनमधील महिलांमध्ये कुतूहल वाढले
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत वागले या मध्यमवर्गीय कुटुंबाचा दैनंदिन संघर्ष आणि त्यांचे यशापयश दाखवले आहे. अलीकडच्या भागांमध्ये वागले यांच्या घरी एका रहस्यमय टेडी बेअरचे पार्सल येते. ते कुणी आणि कुणासाठी पाठवले आहे, याचे तपशील नसल्यामुळे साई दर्शन सोसायटीमधल्या महिलांमध्ये कुतूहल आणि गोंधळ माजतो.
साई दर्शनमधल्या महिला असा अंदाज बांधतात की, हे टेडी बेअर वंदना वागले (परिवा प्रणती) आणि राधिका वागले (भारती आचरेकर) यांना त्यांच्या पतीने म्हणजे राजेश (सुमित राघवन) आणि श्रीनिवास (अंजन श्रीवास्तव) यांनी पाठवले असावे. कारण या दोघींचा आपल्या पतीशी वाद झालेला असतो. तर, साई दर्शनच्या दुसऱ्या महिलांना मात्र त्यात तथ्य वाटत नाही. वागले कुटुंबातल्या प्रत्येकाला खात्री वाटू लागते की तो रहस्यमय टेडी आपल्यासाठीच पाठवलेला असणार आणि या भावनेने घरात कुजबूज, अंदाज होऊ लागतात आणि एक गोड रोमान्सची भावना सगळ्यांना जाणवू लागते. रहस्य अधिकाधिक गूढ होऊ लागते, तेव्हा सगळ्या महिला ते टेडी बेअर कोणी पाठवले असावे याचा शोध घेऊ लागतात आणि त्यावेळी त्यांना समजते की, ते त्यांच्यापैकी कोणासाठीच पाठवण्यात आलेले नाही.
मग, त्या टेडी बेअरचा खरा मालक कोण आहे?
राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “राजेशला नेहमी असे वाटते की घरात जे काही चालू असते, ते त्याला सगळे माहीत असते. पण या टेडी प्रकरणाने तो पूर्ण चक्रावून जातो. त्याला या रहस्याचा शोध घेण्याचीही इच्छा आहे आणि त्याच बरोबर सगळ्यांमध्ये त्या टेडीमुळे जी खळबळ माजली आहे, ती पाहून त्याला गंमतही वाटते आहे. हा टेडी स्मरण देतो की, प्रेम आणि जीवन हे सर्प्राइझेसने भरलेले असते, विशेषतः जेव्हा प्रत्येक जण वेगळ्या दिशेला उत्तर शोधत असतो!”
वंदना वागलेची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “वंदनाला लगेच असे वाटते की टेडी म्हणजे राजेशची एक रोमॅंटिक कृती असणार, विशेषतः त्या दोघांमध्ये झालेल्या छोट्याशा वादानंतर! ती खेळकर आहे, तिच्यात खूप कुतूहल आहे आणि साई दर्शनमधल्या इतर महिलांप्रमाणेच या रहस्याच्या मुळाशी जाण्यास ती उत्सुक आहे. यात गंमत ही आहे की, प्रत्येक स्त्रीला खात्रीने असे वाटते आहे की, हा टेडी तिच्यासाठीच असणार. त्यामुळे सगळ्यांमध्येच तो उत्साह आणि उत्सुकता आहे. टेडीच्या आगमनामुळे एक गोड आणि रोमॅंटिक वळण मिळते आणि यावरून लक्षात येते की एखादी अगदी छोटीशी गोष्ट देखील त्यांच्या जीवनात किती आनंद आणि गोडवा आणू शकते.”