
no images were found
मॅक्सिकोत भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांत घबराट; त्सुनामीचीही भीती
मॅक्सिको : मॅक्सिकोत भूकंपाच्या धक्क्यामुळे एकच खळबळ उडाली तसेच लोक सैरावैरा धावत सुटले. भूकंपाच्या धक्क्यानंतर आता मॅक्सिकोत त्सुनामीचीही भीती व्यक्त होत आहे. तसा इशाराही देण्यात आला असून त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर आत्पकालीन यंत्रनांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आला आहे.
भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरलेले सैरावैरा रस्त्यावर पळत सुटले होते. भूकंपाचे धक्के जाणवत असताना मॅक्सिकोतील इमारती हादरल्याचे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास मॅक्सिकोत 7.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
यूएस जीओलॉजिकल सर्व्हेनं दिलेल्या माहितीनुसार, मॅक्सिकोत झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी होती. ला प्लासिटा मोरेलॉसच्या समुद्रात 10 किलोमीटर खोल भूकंपाचं मुख्य केंद्र होतं. मॅक्सिकोच्या मिचोओकन या राज्यात भूकंप झाल्यानंतर नागरिकांत प्रचंड घाबरात पसरली होती.
मॅक्सिकोत पूर्वी 1985 आणि 2017मध्येही भूकंप झाल्याची नोंद आहे. आता काही व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ मॅक्सिकोतील भूकंपाच्या धक्क्यानंतरचे असल्याचा दावा करण्यात येतोय. या व्हिडीओची पडताळणी करण्यात आलेली नाही. जपानच्या तैवानमध्ये रविवारी भूकंपाचे एकामागोमाग एक असे तीन धक्के बसले होते. त्यानंतर जपानमध्येही त्सुनामीची भीती वर्तवण्यात आली होती. या भूकंपाने तैवानमध्ये मोठं नुकसान झालंय. तैवानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ही 7 रिश्टर स्केल पेक्षाही जास्त असल्याची नोंद करण्यात आली होती.