Home सामाजिक जे.डी. कुलकर्णी यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

जे.डी. कुलकर्णी यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

0 second read
0
0
102

no images were found

जे.डी. कुलकर्णी यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे सपत्नीक सन्मानित करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दरवर्षी उल्लेखनीय कार्याबद्दल विविध स्तरावरील तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार दिला जातो.  सन २०१८ सालच्या ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कारासाठी श्री कुलकर्णी यांची निवड झाली होती.

उत्तम प्रशासकीय अधिकारी आणि पारदर्शक कारभारासाठी जे. डी. कुलकर्णी सर्वांना परिचित आहेत. आशियाई विकास बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या रस्ते सुधारणा प्रकल्पामध्ये समन्वय  अधिकारी म्हणून ते काम पाहत आहेत. यापूर्वी शासनाची धोरणे ठरवणाऱ्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे.

महाराष्ट्र शासनाचा वैयक्तिक पुरस्कार जाहीर मिळाल्याबद्दल चंपावती चॅम्पीयन ग्रुप सार्वजनिक बांधकाम विभाग अन्य शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी जे.डी. कुलकर्णी यांचे अभिनंदन करुन पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…