Home सामाजिक  वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे डायमंड आणि पोलकी महोत्सवाचे आयोजन

 वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे डायमंड आणि पोलकी महोत्सवाचे आयोजन

2 second read
0
0
19

no images were found

 वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे डायमंड आणि पोलकी महोत्सवाचे आयोजन

 सोनेरी क्षणांचे सोबती” म्हणून 114 वर्षांची अभिमानास्पद परंपरा जपत वामन हरी पेठे ज्वेलर्स ने त्यांच्या कोल्हापूर येथील शोरूम मध्ये डायमंड आणि पोलकी महोत्सवाचे आयोजन केले आहे. लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री.आशिष पेठे, पार्टनर, वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रामुख्याने उपस्थित होते. हा महोत्सव 5 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. या उद्घाटनाचे निमित्त साधून वामन हरी पेठे ज्वेलर्स हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५० टक्के सूट मिळणार आहे आणि सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीवर एक चांदीचे नाणे मोफत मिळणार आहे.कोल्हापूर मधील ताराबाई पार्क येथील असलेल्या सासणे ग्राउंड जवळील शोरूम मध्ये संपर्क साधावा.
श्री आशिष पेठे, पार्टनर, वामन हरी पेठे ज्वेलर्स म्हणाले की, वामन हरी पेठे ज्वेलर्स म्हणजे केवळ दागिन्यांमध्येच नव्हे तर त्याच्या व्यवहारांमध्ये शुद्धता, शुद्ध विश्वास, नाविन्यपूर्ण डिझाइन्स, उत्कृष्ट दर्जा, कलाकुसर आणि डिस्प्लेवरील डिझाईन्सचे उत्कृष्ट फिनिशिंग यासाठी ओळखले जातात. वामन हरी पेठे ज्वेलर्स मध्ये आमच्या मूल्यवान ग्राहकांना सर्वोत्तम ग्राहक सेवा आणि ग्राहक अनुभव देण्याचा आम्हाला अभिमान आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स हे आमच्या ग्राहकांच्या सर्व दागिन्यांच्या गरजांसाठी एक स्टॉप शॉप आहे.
यावेळी अमृता खानविलकर म्हणाल्या ” इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात आपल्याला सगळ्या गोष्ठी एकाच छताखाली हव्या असतात वामन हरी पेठे ज्वेलर्स ने आयोजित केलेला हा पोल्की महोत्सव त्याचेच प्रतिबिंब आहे , देशभरातुन वेगवेगळ्या कारागिरांनी बनविलेल्या डिझाइन्स इथे पाहायला मिळणार आहेत ,तरी सर्व कोल्हापूरकरांना , स्त्रियांना व त्यांच्या परिवाराला त्यांनी आवाहन केले कि , या आणि या महोत्सवाचा लाभ घ्या. ”

वामन हरी पेठे ज्वेलर्सला नुकतेच डोमेस्टिक जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलने “मोस्ट प्रीफर्ड रिटेलर्स ऑफ इंडिया”म्हणून गौरविले आहे आणि रेडिओ सिटीद्वारे अलीकडेच 30 पॉवरलिस्टच्या 30 एलिटिस्ट पॉवर-पॅक्ड बिझनेसच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सचोटीने वागणे, वस्तू, व्यवहार आणि वर्तनात शुद्धता, हे आमचे ब्रीदवाक्य आहे आणि या संकल्पनेवरच आमची संस्था इतकी वर्षे टिकून आहे. आम्ही 2000 मध्ये टॅग लाइन तयार केली आणि ती जोपासली आणि 2001 मध्ये ती अस्तित्वात आणली. पुढे ते म्हणाले, एखादा ग्राहक जेव्हा आनंदी असतो किंवा काहीतरी साजरे करत असतो तेव्हा आमच्याकडे येतो. आणि आम्ही भाग्यवान आहोत कि आमच्याकडे आनंदी ग्राहक येतात. आमचं प्रॉडक्ट असे आहे कि, जेव्हा प्रत्येक ग्राहकाच्या आयुष्यात सोनेरी क्षण येतात जसे लग्न, वाढदिवस, अनिव्हर्सरी, तेव्हा त्या दिवसाच्या आठवणींची एक साठवण म्हणून तो आमच्याकडून एक दागिना विकत घेतो, पण तेव्हा आम्ही त्याला वस्तू म्हणून विकत नाही तर, आम्ही त्यांच्या प्रत्येक सोनेरी क्षणाचे साथीदार असतो. आणि हीच आमच्या टॅगलाइन मागची धारणा आहे आणि त्याचा खरा अर्थ आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…