Home सामाजिक सेरेन्डिपिटी आर्ट्स महोत्सवात  प्रमुख कला म्हणून साहित्याची ओळख 

सेरेन्डिपिटी आर्ट्स महोत्सवात  प्रमुख कला म्हणून साहित्याची ओळख 

3 min read
0
0
29

no images were found

सेरेन्डिपिटी आर्ट्स महोत्सवात  प्रमुख कला म्हणून साहित्याची ओळख 

गोवा  – सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये साहित्याचा प्रमुख कलाप्रकार म्हणून समावेश व्हावा, यासाठी जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन आणि सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टेक्स्ट/मॅटर्स’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प उपखंडातील लेखनाच्या सांस्कृतिक समृद्ध परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित आहे, विशेषत: या प्रदेशाच्या वारशात खोलवर रुजलेल्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो. ‘टेक्स्ट/मॅटर्स’ हा साहित्य आणि कला यांच्यातील सुसंवादाचा उत्सव असून, जेसीबी लिटरेचर फाऊंडेशनच्या या महोत्सवात आंतरविद्याशाखीय आणि आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्याच्या वचनबद्धतेत एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये फाऊंडेशनने ‘फिक्शन मॅटर्स: अ वेल्थ ऑफ इमॅजिनेशन अक्रॉस द आर्ट्स’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते, ज्यात स्वतंत्र व्यावसायिक कलाकार वीणा बसवराजय्या, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक विक्रम अय्यंगर, जेसीबी पुरस्कार साहित्याच्या साहित्य संचालिका मीता कपूर आणि कलाकार, छायाचित्रकार आणि क्युरेटर अक्षय महाजन आदी वक्ते म्हणून सहभागी झाले होते.

जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशनने गोव्यातील पणजी येथील जुन्या जीएमसी मध्ये असलेल्या ‘टेक्स्ट/मॅटर्स’ प्रकल्पात जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या गेल्या सहा वर्षांतील समकालीन भारतीय कादंबरीतील उल्लेखनीय कलाकृतींचे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनात 7 भाषांतील 21 भाषांतरांसह एकूण 60 पुस्तकांचा समावेश असून, या सर्व पुस्तकांची जे.सी.बी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकांनी उपखंडातील कथांचे समग्रचित्रण सादर केले आणि वाचकांना प्रत्येक पानाच्या शेवटी नवीन साहस आणि वैविध्यपूर्ण उपसंस्कृतींची झलक दिली.

फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार विजेत्या साहित्य संचालिका मीता कपूर म्हणाल्या-

‘जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन गेल्या सहा वर्षांपासून भारतीय साहित्याला एक वेगळे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. विविध भाषांतील समकालीन कादंबरी लेखकांना पुरस्कार देणारा जे.सी.बी पारितोषिक असो किंवा सरकारी शाळांसाठीचा अनोखा डीआयवाय लायब्ररी कार्यक्रम आणि अभ्यासक्रम असो किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना पाठिंबा असो, भारतीय साहित्याचा प्रसार करणे आणि आपल्या साहित्यिक वारशात अभिमानाची भावना निर्माण करणे हे फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे.

साहित्य, मग ते काल्पनिक असो वा अन्यथा, कोणत्याही कलेचा कणा असतो, परंतु बऱ्याचदा आपल्याला ज्या स्वरूपात ते दिसते किंवा मिळते आपण त्या कडे त्याच दृष्टिकोनातून बघतो आणि त्याच्या स्त्रोताच्या मजकुराच्या मुळगाभ्यापासून दूर जातो. यावर्षी जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशनच्या सहाय्याने ‘टेक्स्ट/मॅटर्स’ या प्रकल्पाचा उद्देश प्रेक्षकांना साहित्याकडे सर्व कलापद्धतींच्या चौकटीत राहून एक कलाकृती म्हणून पाहण्याची प्रेरणा देणे हा आहे. सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील कलेच्या विविध अभिव्यक्तींना भरून काढण्याच्या दिशेने काम करत आहे आणि ही दरी आणखी कमी करणाऱ्या या सहकार्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.

सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल अँड फाऊंडेशनच्या संचालिका स्मृती राजगढिया म्हणाल्या-

“सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशन जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन फॉर सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2023 सोबत भागीदारीची घोषणा करताना सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशनला आनंद होत आहे. जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशनने टेक्स्ट मॅटर्स प्रकल्पाला दिलेला पाठिंबा हा कलेतील आंतरविद्याशाखीय देवाणघेवाण वाढविण्याच्या आमच्या सामायिक समर्पणाचा पुरावा आहे. ‘टेक्स्ट/मॅटर्स’ सांस्कृतिक लेखनाच्या समृद्ध परंपरेशी आमचा संबंध अधोरेखित करते, मार्ग आणि आर्ट इंडिया या महत्त्वाच्या नियतकालिकांमधील पुराभिलेखागारांचे प्रदर्शन करते. जे.सी.बी.एल.एफ सोबत भागीदारी करताना आम्ही उत्सुक आहोत – ज्यांनी भारतीय कादंबरी अनुवादांना चालना देण्यात मोठी भूमिका बजावली आहे – केवळ भूतकाळ साजरा करण्यासाठीच नव्हे तर स्वतंत्र प्रकाशकांना व्यासपीठ प्रदान करण्यासाठी आणि मुद्रित संस्कृती आणि कलेतील लेखनाबद्दल अभ्यासपूर्ण चर्चा आयोजित करण्यासाठी पण मोठी भूमिका बजावली आहे.”

‘टेक्स्ट/मॅटर्स’ हा सांस्कृतिक परंपरेचा शोध घेण्यात खोलवर रुजलेला प्रकल्प आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशनला मार्ग हे 77 वर्षे जुने नियतकालिक आणि आर्ट इंडिया या आधुनिक आणि समकालीन कलेचा 27 वर्षांचा इतिहास असलेले अग्रगण्य त्रैमासिक अशा दोन प्रभावी प्रकाशनांचे पुराभिलेखागार सादर करताना अभिमान वाटतो

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दावर सुप्रीम कोर्टाचा महत्वाच निर्णय; थेट याचिकाच फेटाळल्या

समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दावर सुप्रीम कोर्टाचा महत्वाच निर्णय; थेट याचिकाच फेटाळल्य…