no images were found
भारत-चीन संबंधांबाबत शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात (दि. २०) ‘भारत-चीन संबंध’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. यशवंत थोरात हे बीजभाषण करणार आहेत, अशी माहिती राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार व नेहरू अभ्यास केंद्राचे प्रल्हाद माने यांनी दिली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात येईल. पहिल्या सत्रात कर्नल शिव कुणाल वर्मा यांचे ‘भारत-चीन संबंध’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार असतील. दुसऱ्या सत्रात डॉ. राहुल त्रिपाठी व डॉ. सुखदेव उंदरे हे ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयावर बोलतील. डॉ. प्रल्हाद माने सत्राध्यक्ष असतील. तिसऱ्या सत्रात डॉ. अशोक चौसाळकर ‘भारत-चीन संबंधांतील समकालीन प्रवाह’ या विषयावर मांडणी करतील. डॉ. भारती पाटील सत्राध्यक्ष असतील. समारोप सत्र श्रीराम पवार आणि डॉ. रविंद्र भणगे यांच्या उपस्थितीत होईल.