Home शासकीय  शहरा लगतच्या ग्रामीण भागातील 65 अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाई

 शहरा लगतच्या ग्रामीण भागातील 65 अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाई

10 second read
0
0
29

no images were found

 शहरा लगतच्या ग्रामीण भागातील 65 अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाई

कोल्हापूर   : कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणी पुरवठा विभागाकडील पाणीपट्टी शाखेच्या वतीने अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करणेची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअतंर्गत मंगळवारी शहरालगतच्या ग्रामीण भागातील 65 जणांवर महानगरपालिकेच्या लाईनवरुन अनाधिकृत पाणी वापर करणा-या कनेक्शनधारकांवर कारवाई करण्यात आली. हि कारवाई नागदेव कॉलनी, बालाजी पार्क, महालक्ष्मी कॉलनी, भूमिनंदन कॉलनी, मथूरा नगरी या शहरालगतच्या ग्रामीण भागात करण्यात आली. यामध्ये प्रशांत सावंत, रमेश बामणे, विनायक ठोमके, आनंदा पाटील, उत्तम पाटील, मारुती जाधव, मंगेश अन्नछत्र, विनायक राणे, तुषार चौगले, श्रृषिकेश लोखंडे, सचिन पाटील, मोहन कुंभार, भाऊसाो पाटील, सविता गायकवाड, उत्तम पाटील, सुमन थट्टेवाले, अंकुश कदम, अंजली बंडगर, अजिंक्य विंचू, सदाशिव हाळवे, शुभम बामणे, समीर ठक्कर, रणजीत जाधव, राजाराम शेळके, संतोष गावडे, रवी घाडगे, लक्ष्मण जाणकर, अमीतकुमार नलवडे, प्रमेश त्रिमुखे, कल्पना सिताराम कांबळे, साबीया निसार शेख, तेजस चंद्रकांत माने, सुनिल रावसो कदम, समशेरसिंह शंकरसिंह रजपूत, विरेंद्र विजयराव यादव, प्रमोद आवळे या लोकांची अनाधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली. यावेळी या सर्वांना दंडात्मक कारवाईची 7 दिवसांची नोटीस लागू करण्यात आलेली आहे. सदर अनधिकृत नळ कनेक्शन जोडून देणाऱ्या प्लंबरवर देखील महापालिकेच्यावतीने फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

            सदरची कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव व जल अभियंता नेत्रदिप सरनोबत यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता प्रिया पाटील, पाणीपट्ठी अधिक्षक प्रशांत पंडत, ए वॉर्ड गांधीमैदान विभागातील सर्व मिटर रिडर व सहाय्यक, फिटर यांनी केली . तरी सदरची मोहिम यापूढेही पाणी पुरवठा विभागामार्फत चालू राहणार असलेने, शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांनी रितसर महानगरपालिकेची परवानगी घेवून, आवश्यक ती फी भरून आपले कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. अन्यथा त्यांचे पाणी कनेक्शन खंडीत करणेत येईल असे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …