Home शासकीय बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना दहा लाख देण्याचे निर्देश : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना दहा लाख देण्याचे निर्देश : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0 second read
0
0
55

no images were found

बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना दहा लाख देण्याचे निर्देश : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : १९ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा मृत्यू झाला होता. श्रीमती तडवी यांच्या कायदेशीर वारसांना दहा लाख रु. रक्कम लवकरात लवकर द्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वन विभागास दिलेले आहेत.
या महिलेच्या कुटुंबियांना वन विभागाकडून देण्यात येणारे आर्थिक सहाय्य लवकरत लवकर मिळण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वन अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाबाबत दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती घेतली. सर्व शासकीय स्तरावरील यंत्रणेला आदेश करुन तसेच जिल्हा वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांना अहवाल प्राप्त करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या अहवालानुसार जिल्हा वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी श्रीमती मोगराबाई रुमा तडवी यांच्या कायदेशीर वारसांना रू. १० लाख तात्काळ मंजूरीचे आदेश दिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड

 आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड       &n…