
no images were found
चीनमध्ये लॉकडाऊनला विरोधी आंदोलनादरम्यान १० लोकांचा मृत्यू
चीन : चीनमध्ये अनेक दिवसांपासून कोरोना रुगणांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. कोरोन रुग्णसंख्येने जवळ जवळ ३० हजाराचा आकडा गाठला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील प्रशासनाने अनेक शहरांमध्ये परत लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र या लॉकडाऊन विरोधात जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसते आहे. जनतेचा लॉकडाऊनला विरोध आहे. जनतेकडून लॉकडाऊन हटवण्यासाठी प्रदर्शने तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. या लॉकडाऊन विरोधी आंदोलनादरम्यान १० लोकांचा मृत्यू झाला आहे.
सहा महिन्याचा आढावा घेता चीनमध्ये कोरोना रुग्ण संख्येत सतत प्रचंड वाढ होताना दिसतेय. हा आकडा सुमारे 30 हजारांहून अधिक आहे. या कारणामुळे सध्या चीन सरकारने झिरो कोविड धोरण लागू करत अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध व लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु शून्य कोविड धोरणाला विरोध करीत लॉकडाऊन मागे घेण्याच्या मागणीसाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेकडून लॉकडाऊन हटवण्यासाठी प्रदर्शने तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. काही ठिकाणी या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. या लॉकडाऊन विरोधी आंदोलनादरम्यान १० लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये परिस्थिती हाताबाहेर पोहोचली आहे. बीजिंगमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले असून क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णसंख्येत वाढ होऊन गर्दी वाढत असल्याचे समोर येतेय. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्यात येत आहे. बीजिंमधील जिल्ह्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढल्याने लोक ऑनलाइन साईटवरून खरेदी करून जीवनावश्यक वस्तूंचा साठा करताना दिसत आहेत.