
no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचे उद्घाटन
कोल्हापूर / प्रतिनिधी : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या केमिकल अभियांत्रिकी विभागाचे आणि माजी विद्यार्थ्यानी ६७ लाखांची निधीतून उभारलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅब’चे उद्घाटन प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्या हस्ते झाले. माजी विद्यार्थ्यानी दिलेले योगदान महत्वपूर्ण असून नव्या विद्यार्थ्यांना ही लॅब अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉ. चेडे यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब’साठी केमिकल विभागाच्या माजी संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या केमिकल रिएक्टर, प्लेट टाइप हिट एक्सचेंजर, डिस्टीलेशन सेट अप, रिऍक्टर साठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पॅकिंग अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी केमस्पेप्ट इंजिनिअरिंग प्रा. लि. पुणे चे प्रकाश बंडगर, एच.एक्स. इंडियाचे अभय कुलकर्णी आणि प्रफुल्ल वायफळकर, केम ऑर्बिटचे किरण पाटील, तसेच नरेश हंचाते, रोहित अंतुलवार, प्रवीण आयवळे, साईसागर खोत, ऑक्सिकेमचे शुभम पाटील यांनी योगदान दिले आहे. या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नूतनीकरण झालेल्या सर्व लॅब्स आणि रिसर्च लॅबचे उद्घाटन तसेच प्लेसमेंट ब्रोशर, टेक्निकल मॅगझिन आणि न्यूज लेटर्स यांचे प्रकाशन यावेळी झाले.
याप्रसंगी बोलताना केमसेप्ट इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड चे प्रकाश बंडगर म्हणाले, “केमिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकी महत्वपूर्ण शाखा आहे. केमिकल शाखेच्या अभियंत्यांसाठी भविष्यकाळ उज्ज्वल आणि देदिप्यमान आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा ठरवून खडतर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी. सर्व माजी विद्यार्थी यापुढेही महाविद्यालयासाठी आवश्यक ते सहकार्य करतील.
माजी विद्यार्थ्यांनी ही लॅब उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार, दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. याचा फायदा नव्या विद्यार्थ्यांना होईल. या माध्यमातून या विद्यार्थ्याचे समाज आणि देशांसाठी योगदान राहील. समस्त मानवजातीसाठी या केमिकल शाखेचे महत्वपूर्ण योगदान असेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे यांनी केले.
विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव म्हणाले, या विभागासाठी नूतन सात अद्ययावत लॅब्स, रिसर्च लॅब आणि नवीन इन्फ्रास्ट्रक्टरबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि व्यवस्थापनाचे अत्यंत आभारी आहोत. तसेच लॅब उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचेही मी आभार मानतो. उत्कृष्ट अध्यापन आणि संशोधन या माध्यमातून विभागाची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची घोडदौड सदैव चालू राहील.
सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहयोगी प्राध्यापक लेफ्टनंट डॉ. राहुल महाजन यांनी केले. या माजी विद्यार्थ्यांनी सदर रिसर्च लॅब संशोधनासाठी सुसज्ज करणेसाठी आवश्यक उपकरणे पुरविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,विश्वस्त श्री. ऋतुराज पाटील, डॉ .ए.के. गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे. उद्घाटन समारंभावेळी रजिस्ट्रार डॉ. एल व्हि. मालदे, अधिष्ठात डॉ. अमरसिंग जाधव, डॉ. राहुल पाटील, प्रा. सुदर्शन सुतार, सह अधिष्ठाता प्रा.मनीषा भानुसे, प्रा. रविंद्र बेन्नी, टिपीओ प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.