no images were found
आरोग्य कार्यालयास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची अचानक भेट
कोल्हापूर : महापालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी पहाटे 6.00 वाजता सी वॉर्ड-1 शाहू क्लॉथ मार्केटमधील आरोग्य कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व हजेरीपत्रक तपासणी, रजांची तपासणी करुन कामकाजाची माहिती घेतली. यामध्ये 10 सफाई कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी गैरहजर कर्मचा-यांचा सोमवार दि.18 डिसेंबर 2023 रोजीचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड यांना दिले. यामध्ये बिंदु चौक, महालक्ष्मी मंदिर परिसर, कॉमर्स कॉलेज परिसरातील सफाई कर्मचारी प्रमिला कुदळे, संतोष थोरात, प्रथमेश सोनुले, मिरा वाघे, उषा घाटगे, संगिता हत्तीकर, बाळासो देसाई, वैशाली कांबळे, लखन रणभिसे, संतोष आवळे असे 10 स्वच्छता कर्मचारी अनुउपस्थित असलेने त्यांना निदर्शनास आले आहे. तसेच शिला सारवान व विकास सरवान हे कर्मचारी सतत गैरहजर असलेचे निदर्शनास आलेने त्यांचे विरुध्द पुढील प्रशासकीय कारवाई सुरु करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरिक्ष्क यांना दिले. यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड आदी उपस्थित होते.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी विभागीय कार्यालयाअंतर्गत चार प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे नियंत्रण अधिकारी उप-आयुक्त व सहा.आयुक्त यांनी दैनंदिन कामकाज पाहताना आपण विभागीय कार्यालयाअंतर्गत आरोग्य विभागाकडील सॅनिटेशन वॉर्डचेही नियंत्रण करणेचे यापुर्वी आदेश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त क्र.१ व 2 यांनी शहरातील सॅनिटेशन वॉर्डच्या हजेरीच्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे आदेशही पारित केले आहेत.