no images were found
सेंट्रम ने केली मल्टिव्हिटॅमिन आणि प्रोटीन पावडर्सच्या प्रसारासाठी नवीन मोहिमेची सुरुवात
सेंट्रम या जगभरांतील पहिल्या क्रमांकाच्या मल्टिव्हिटॅमिन ब्रॅन्ड तर्फे आज व्यावसायिक आणि कलाकार असलेल्या काजल अगरवालची त्यांच्या भारतातील मल्टिव्हिटॅमिन आणि प्रोटीन पावडर्सच्या ब्रॅन्ड ॲम्बेसडर पदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. अनेक भारतीयांना त्यांच्या पोषणाशी संबंधित गरजांविषयी जागरुकतेचा अभाव आहे. खरे पाहता, १० पैकी ८ भारतीयांमध्ये मल्टिव्हिटॅमिन्सची कमतरता आढळते. काजल सोबतची सेंट्रमची ही मोहिम समतोल आहारासह पोषणाची ही गरज पूर्ण करण्यासाठी मल्टिव्हिटॅमिन्स च्या आहारातील समोवशाच्या महत्त्वाला अधोरेखित करते. सेंट्रम च्या सहकार्याने काजलच्या बहुआयामी रोल्स च्या व्यवस्थापनातील अखंडपणा हा या मोहिमेत अधोरेखित केला जात आहे.
या भागीदारी विषयी आपला उत्साह व्यक्त करतांना काजल म्हणते “ एक कलाकार, व्यावसायिक आणि एक नवोदित माता म्हणून मी रोज १०० टक्के देऊन माझ्यासारख्या बहुआयामी जीवनाला आकार देत असते, म्हणूनच तुमच्या शरीराला आरोग्यपूर्ण ठेवण्याची मोठी गरज असते. सेंट्रम सारख्या विश्वसनीय ब्रॅन्ड बरोबर त्यांच्या मल्टिव्हिटॅमिन प्रोटीन पावडर्स आणि गमीज रेंज साठी सहकार्य करतांना मी खूपच उत्साही आहे. हे पाहणे खूपच हृदयद्रावक आहे की ब्रॅन्ड तर्फे महिलांची खरी काळजी घेतली जात आहे आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. मला आशा आहे की भारतीय महिला त्यांच्या अंतर्गत आरोग्याची काळजी घेतील, जेणेकरुन त्यांचे बाह्य सौंदर्य अधिक खुलू शकेल.”
या सहकार्या विषयी बोलतांना, हेलिऑनच्या भारतीय उपखंडाच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख अनुरिता चोप्रा यांनी सांगितले “ बहुआयामी जीवन ही नवीन जीवनशैली आहे, आणि आपण अनेक भुमिका यावेळी बजावत असतो, त्यासाठी आरोग्यपूर्ण राहणे आवश्यक असते. सेंट्रम कडून प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला रोज गरजेचे मल्टिव्हिटॅमिन्स रोजच्या आहारासह घेऊन बहुआयामी भुमिका अदा करण्यासाठी प्रोत्साहीत करत आहे. काजल, ही अनेकांसाठी प्रोत्साहन देणारी आहे आणि रोजच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सुयोग्य अशी प्रोत्साहक आहे. आम्ही भारतीयांना केवळ मल्टीविटामिन्सचे महत्त्व समजावत नाही तर वर्तणुकीत बदल घडवून आणू अशी आशा करतो ज्यामुळे भारतीयांना आतून निरोगी आणि बाहेर चमक निर्माण होते. ”
एफसीबी इंटरफेसचे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर अरिजित सेनगुप्ता यांनी सांगितले “ सेंट्रम विमेन ॲन्ड किड्स मल्टिव्हिटॅमिन तसेच प्रोटिन साठी काजल अगरवाल बरोबरची ही भागीदारी म्हणजे प्रामाणिकते साठी वचनबध्दतेचा पुरावा आहे. एक माता म्हणून काजल नेहमीच विविध प्रकारचे जीवन जगत आली असून तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांमध्ये समतोल साधला आहे. म्हणूनच ती मल्टिव्हिटॅमिन्सचा समावेश रोजच्या डाएट मध्ये करुन आणि सेंट्रम विमेन मल्टिव्हिटॅमिन ॲन्ड प्रोटीनचा उपयोग करते. सेंट्रम प्रसिध्द असलेल्या सहजतेसह ब्रॅन्डचे घोषवाक्य मोअर पावर फॉर यू मध्ये तिच्यामुळे शक्ती प्राप्त झाली आहे.”
एफसीबी इंटरफेस चे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर- मिथुन मुखर्जी यांच्या मते “ आजच्या वेगवान जीवनात महिलांना खूपवेळा बहुआयामी काम करावे लागते, यामध्ये काळजीवाहक, व्यावसायिक, भागीदार आणि पालक म्हणून काम पहावे लागते. दुर्दैवाने त्याचा डाएट हा त्यांच्या जीवनशैलीनुसार नसतो आणि यात दरी राहते. ही दरी पूर्ण करण्यासाठी मल्टिव्हिटॅमिन्स महत्त्वाची असतात. आपल्या देशातील बहुआयामी जीवनाचे प्रतिनिधीत्व करणार्या काजलला आणून आम्ही सेंट्रम मल्टिव्हिटॅमिन्स साठी स्वत:हून ग्राहक आणली आहे. तिचा आवाज अनोखा आहे आणि ती समाजमाध्यमातून तिच्या चाहत्यां बरोबर योग्य संवाद साधत असते, म्हणून ती या मोहिमेसाठी सुयोग्य ठरली.”
मल्टिव्हिटॅमिन आणि प्रोटिन पावडर्स सह मल्टिव्हिटॅमिन गमीज च्या या नवीन विभागा मुळे सेंट्रम आता लोकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनून त्यांना रोज पूर्ण क्षमतेने युक्त बनवण्यास सक्षम बनले आहे. सेंट्रम ची उत्पादने ही पुरुष, महिला आणि लहान मुलांसाठी आहेत. महिला आणि पुरुषांच्या प्रकारात २४ महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि वनस्पतींवर आधारीत पोषक घटक असल्याने संपूर्ण आरोग्याची काळजी घेतली जाते. मुलांसाठीच्या उत्पादनांमध्ये २४ महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोबायोटिक्स सह वनस्पती आणि दुधापासून तयार केलेल्या प्रोटिन्स मुळे सर्वसमावेशक वाढ होण्यास मदत होते. सर्वाधिक क्लिनिकली अभ्यास करुन तयार करण्यात आलेला मल्टिव्हिटॅमिन ब्रॅन्ड असलेल्या सेंट्रम ने लोकांचे आयुष्य सहज करुन आरोग्यपूर्ण आणि बहुआयामी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.