
no images were found
खाद्य महोत्सवामध्ये तीन लाख सहासष्ठ हजाराची बचत गटांची उलाढाल
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाची सांगता रविवार दि.17 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली. या तीन दिवसाच्या खाद्य महोत्सवामध्ये शहरातील 48 गचत गटांच्या स्टॉलमधून 3,66,802/- इतके उत्पन्न झाले आहे. हा महोत्सव महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व दिन.अ.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामार्फत ताराबाई पार्क जवळील सासने मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वडा कोंबडा, बिर्याणी रस्सा, तांबडा-पांढरा रस्सा, चिकन 65, खांडोळी, नॉनव्हेज रोल, मटण लोणचे, गार्लिक चिकन, रक्तीमुंडी, सर्व प्रकारची लोणचे, आंबोळी, दावणगिरी डोसा, झुणका भाकर, वडापाव, पकोडे, व्हेजरोल, पाणी पुरी, पिझ्झा, सॅण्डविच, थालीपीठ, घरगुती बिस्किट, सर्व प्रकारचे लाडू, बिस्कीटे व इतर पदार्थ या स्टॉलवर नागरीकांना खावयास मिळाले.
या खाद्य महोत्सवामध्ये व्हेजचे 26 स्टॉल, नॉनव्हेजचे 19 स्टॉल व 3 वस्तूंचे असे 48 स्टॉल लावण्यात आला होते. या स्टॉलमधे ज्याची जास्त विक्री झाली आहे अशा व्हेज व नॉनव्हेजमधुन तीन क्रमांक काढण्यात आले. नॉनव्हेजमध्ये प्रथम क्रमांक ताजकृष्ण स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांची रु.31000/- ची विक्री, द्वितीय क्रमांक आएशा स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांची रु. 26500/- विक्री व तृतीय क्रमांक श्री समर्थ स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांची रु. 16500/- ची विक्री झाली. तसेच व्हेज मध्ये प्रथम क्रमांक गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांची रु.20500/- ची विक्री, द्वितीय क्रमांक अल्पता स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांची रु.14500/- ची विक्री व तृतीय क्रमांक मंथरा स्वयंसहाय्यता महिला बचत गटा यांची रु.10900/- ची विक्री झाली. या सर्वांना उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते रोपटे देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपशहर अभियंता रमेश कांबळे, विजय वणकुद्रे व नागरिक उपस्थिती होते. तसेच निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर, स्वाती शहा व अंजली सौंदलगेकर तसेच सोनचिरैया शहर उपजिवीका केंद्राच्या वृषाली चौगुले व अश्विनी चुयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.