no images were found
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानामध्ये विविध योजनेचा 2035 लाभार्थ्यांना लाभ
कोल्हापूर : केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने ज्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक प्रक्रियेत आणण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या ठिकाणी चित्ररथाद्वारे शासनाच्या विविध योजना स्क्रिनवर दाखविण्यात येत आहेत.
या मोहिमेअंतर्गत दि.9 ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत ही संकल्प यात्रा कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी असणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत 3 दिवसात केंद्र शासनाच्या विविध योजनेसाठी 2035 लाभार्थ्यांनी संकल्प यात्रेच्या ठिकाणी भेट देऊन विविध योजनेसाठी आपले फॉर्म भरलेले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 150, पी.एम.स्वनिधी साठी 322, आयुष्यमान भारत कार्ड साठी 486 लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. तर आरोग्य विभागाच्या हेल्थ कॅम्पमध्ये 1077 नागरीकांनी आपली तपासणी करुन घेतली आहे. या संकल्प यात्रेच्या ठिकाणी आजअखेर 8050 नागरीकांनी बूथवर भेट दिलेली आहे.
हि संकल्प यात्रा मंगळवार, दि.12 डिसेंबर 2023 रोजी सुभाषनगर व आर के नगर, बुधवार, दि.13 डिसेंबर 2023 रोजी एसटी स्टॅण्ड व सायबर चौक, गुरुवार, दि.14 डिसेंबर 2023 रोजी सोन्यामारुती चौक व गंगावेश, शुक्रवार, दि.15 डिसेंबर 2023 रोजी रंकाळा तलाव व सदरबाजार,शनिवार, दि.16 डिसेंबर 2023 रोजी सासने मैदान व शाहू मार्केट यार्ड, रविवार दि.17 डिसेंबर 2023 रोजी फुलेवाडी व उभा मारुती चौक, सोमवार दि.18 डिसेंबर 2023 रोजी नागाळा पार्क व रमणमळा चौक, मंगळवार दि.19 डिसेंबर 2023 रोजी हुतात्मा पार्क चौक व उद्यमनगर याठिकाणी घेण्यात येणार आहे.