Home शैक्षणिक  कोल्हापूर आयोजित आविष्कार 2023-24 विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा महोत्सव

 कोल्हापूर आयोजित आविष्कार 2023-24 विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा महोत्सव

3 second read
0
0
44

no images were found

 कोल्हापूर आयोजित आविष्कार 2023-24 विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा महोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्ठीकोन निर्माण करण्याचं उद्दीष्ट घेऊन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दरवर्षी अविष्कार हा संशोधन महोत्सव आयोजित करते. उद्या दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी यावर्षीची विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव अविष्कार २०२३-२४" विद्यापीठ मध्ये राजमाता जिजाऊ संभागृहा मध्ये आयोजित करण्यात येत आहे. सकाळी १०. ३० वा. या स्पर्धेचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रो. डॉ. डि. टी. शिर्के व मा. प्र कुलगुरू. प्रा. पी एस पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सहभागीं विद्यार्थी तीन स्तरांमध्ये वर्गीकृत केले आहेत: पदवी विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी आणि संशोधक. संशोधन सादरीकरणे
मानव्यशस्त्र, भाषा आणि कला; वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा; विज्ञान; कृषी आणि पशुसंवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान; आणि वैद्यकीय आणि फार्मसी या सहा श्रेणींमध्ये असतील. या मध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालये व विभागमधून एकूण ४०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विविध विषयातील संशोधक मार्गदर्शक तसेच प्राध्यापक या पोस्टरचे मूल्यांकन करून त्यातील उत्कृष्ट पोस्टर्स निवडतील जे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेस पाठवले जातील. यातील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा पुरस्कार सोहळा मा. कुलगुरू प्रा डी. टी शिर्के व प्र कुलगुरू प्रा. पी एस पाटील यांच्या हस्ते त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता सिनेट सभागृहामध्ये होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भूगोल विभाग शिवाजी विद्यापीठ मार्फत करण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…