
no images were found
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ फोटोवरूनआदित्य ठाकरेची टीका
रत्नागिरी : जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावरच आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला होता. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.आदित्य ठाकरे यांना काय वाटते यापेक्षा मुंबईच्या लोकांना काय वाटते याच्याशी आम्ही बांधील आहोत, असे म्हणत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. तर मुंबईकरांच्या इतिहासात मुंबईची स्वच्छता करण्यासाठी कुठलाही मुख्यमंत्री स्वच्छता करण्यासाठी रस्त्यावर उतरला नव्हता ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. आजपर्यंत कुठलाच मुख्यमंत्री नाल्यात उतरून सफाई कशी झाली हे बघत नव्हता, असे म्हणत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर थेट प्रतिक्रिया दिली.