Home सामाजिक आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार?

आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार?

4 second read
0
0
34

no images were found


आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार?

 

एकीकडे आधार मोफत अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.केंद्र सरकारने आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. व्होटर आयडीसोबत आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आणि यासाठी कोणतंही टार्गेट किंवा मुदत अद्याप ठेवण्यात आलेली नाही.
कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, भारत सरकारने मतदान ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याला आतापर्यंत सुरुवात केलेली नाही. सध्या आधार-पॅन लिंक करण्याची प्रक्रिया चालू आहे. मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचं कोणतंही लक्ष्य अद्याप देण्यात आलेलं नाही.
कायदा मंत्री मेघवाल यांनी सांगितलं की, भारताच्या निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे की, EPIC शी आधार लिंक करणे अद्याप सुरू झालेलं नाही. याशिवाय फॉर्म 6B जमा करण्याची मुदत एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. मात्र, मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करू शकता. पण, आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करणं अद्याप बंधनकारक करण्यात आलेलं नाही.
तुम्हाला मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करायचा असल्यास, तुम्हाला फॉर्म 6B सबमिट करावा लागेल, ज्याची अंतिम मुदत मार्च 2024 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काँग्रेस खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कायदा मंत्र्यांनी सांगितलं की, ज्यांची ओळखपत्रे वेगळी होती आणि नावे सारखी होती, त्यांची नावं मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.
दरम्यान, आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर आहे. या तारखेनंतर UIDAI आधारमध्ये कोणतीही माहिती अपडेट किंवा बदल करण्यासाठी शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसल्यास वेळ न दवडता वेळीच हे काम करुन घ्या आणि नंतर दंड भरण्यापासून सुटका मिळवा.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…