Home देश-विदेश अफगाण लष्कराच्या गोळीबारात पाकचे 6 लोक ठार, 17 जखमी

अफगाण लष्कराच्या गोळीबारात पाकचे 6 लोक ठार, 17 जखमी

2 second read
0
0
214

no images were found

अफगाण लष्कराच्या गोळीबारात पाकचे 6 लोक ठार, 17 जखमी

पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात तालिबानी ठार

अफगाणिस्तानमध्ये  तालिबानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारामध्ये ६ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर १७ नागरिक जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानच्या लष्कराने रविवारी केलेल्या गोळीबारात ६ लोक ठार, तर १७ जखमी झाले. पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन एजन्सीने सांगितले की, पाक-अफगाण सीमेलगत चमन जिल्ह्यात अफगाण लष्कराने चिथावणी दिली नसतानाही तोफांचा मारा केला. त्यात स्थानिक लोक सापडले. जखमींपैकी चौघांची स्थिती गंभीर आहे. त्यांना चमनहून क्वेटा रुग्णालयात नेले. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही गोळीबार केला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये या घटनेमुळे तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या चमन या भागात हा गोळीबार झाला. पाकिस्ताच्या प्रत्युत्तरामध्ये एका अफगाणी सैनिकाचाही मृत्यू झाल्याची बातमी बीबीसीने दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घटनेचा निषेध केला आहे. या हिसेंमागील कारण समजलेले नसून गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानाचा ताबा घेतल्यानंतर दोन्ही देशांत सुरक्षेच्या मुद्द्यावरून तणाव वाढल्याचे चित्र दिसतेय.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…