Home आरोग्य दुर्मिळ आतड्यांच्या आजारावर वेळेत केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे ३ दिवसांच्या नवजात बाळाचे वाचले प्राण

दुर्मिळ आतड्यांच्या आजारावर वेळेत केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे ३ दिवसांच्या नवजात बाळाचे वाचले प्राण

23 second read
0
0
24

no images were found

दुर्मिळ आतड्यांच्या आजारावर वेळेत केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे ३ दिवसांच्या नवजात बाळाचे वाचले प्राण

वेळीच निदान व आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे आतडयांना बसलेल्या जीवघेण्या पिळ्यातून नवजात बाळाला जीवनदान
कोल्हापूर( प्रतिनिधी): मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथील डॉक्टरांनी इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस या दुर्मिळ आणि जन्मजात आतड्यांच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या केवळ ३ दिवसांच्या नवजात बाळावर यशस्वी उपचार केले. हा आजार वेळेत उपचार न झाल्यास काही तासांत जीवघेणा ठरू शकतो. लक्षणांची लवकर ओळख, तातडीची तपासणी आणि योग्य वेळी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यामुळे बाळाचे प्राण वाचवणे शक्य झाले.
       हे बाळ मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथेच जन्माला आले होते आणि सुरुवातीला त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र दुसऱ्या दिवशी बाळाला दूध पिण्यात अडचण येऊ लागली आणि प्रत्येक फीडनंतर उलट्या होऊ लागल्या. ही धोक्याची चिन्हे ओळखताच बालरोग तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने सखोल तपासण्या सुरू केल्या.
        या प्रकरणाबाबत माहिती देताना डॉ. परितोषा दलाल, सल्लागार – बालरोग व नवजात शल्यचिकीत्सक, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर म्हणाल्या,* “ही अवस्था म्हणजे शस्त्रक्रियेची तातडीची गरज असलेली आपत्कालीन परिस्थिती आहे. बाळाची तत्काळ तपासणी करण्यात आली आणि तातडीची पोटाची सोनोग्राफी तसेच इतर उच्चस्तरीय तपासण्या केल्या. त्यामध्ये लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात अडथळा निर्माण करणारा इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीत चुकीच्या पद्धतीने बसलेली आतडी स्वतःच्या रक्तपुरवठ्याभोवती (सुपीरियर मेसेन्टेरिक आर्टरी) वळतात, ज्यामुळे आतड्यांना जाणारा रक्तपुरवठा थांबण्याचा आणि आतडी सडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बाळाला तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.”
         त्या पुढे म्हणाल्या , “अशा परिस्थितीत रक्तपुरवठा तात्काळ पूर्ववत करणे अत्यंत महत्त्वाचे असते, अन्यथा आतड्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.”
        डॉ. परितोषा दलाल यांच्या नेतृत्वाखालील नवजात शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक आतड्यांवर बसलेला पीळ सोडवून त्वरित रक्तपुरवठा पुन्हा सुरू केला आणि गँग्रीन होण्यापासून आतड्यांचे संरक्षण केले. या वेळी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे बाळाची पचनसंस्था सुरक्षित राहिली.
         त्या पुढे सांगतात, “अशा नवजात बाळांना नेक्रोटायझिंग एंटरोकॉलायटिस (NEC) या गंभीर आजाराचा धोका अधिक असतो, ज्यामुळे आतड्याला छिद्र पडू शकते. या बाळामध्येही पुढे अशीच स्थिती निर्माण झाली आणि खराब झालेला आतड्याचा भाग काढण्यासाठी आणखी एक आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर बाळाला नवजात अतिदक्षता विभागात (NICU) ठेवून सतत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि सखोल नवजात व शस्त्रक्रियात्मक उपचार देण्यात आले. सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर झाली आणि त्याला घरी सोडण्यात आले. सध्या बाळाचे वजनवाढ व आहार नियमितपणे तपासला जात असून त्याच्या वाढीत सातत्याने सुधारणा दिसून येत आहे.”
     आनंद मोटे, क्लस्टर डायरेक्टर, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे म्हणाले, “मणिपाल हॉस्पिटल्समध्ये दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सातत्याने दिली जाते. या प्रकरणातून विविध तज्ज्ञ विभागांमधील समन्वय, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एका छताखाली उपलब्ध असलेल्या सखोल वैद्यकीय अनुभवाचे महत्त्व अधोरेखित होते.”
        ही शस्त्रक्रिया बहुवैद्यकीय पथकाच्या सहकार्याने पार पडली. या पथकात बालशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. परितोषा दलाल, बालरोगतज्ज्ञ डॉ. मुबाशिशीर खान (निओनॅटोलॉजिस्ट) आणि डॉ. उज्ज्वला केसकर, तसेच नवजात अतिदक्षता विभाग आणि रेडिओलॉजी टीमचा समावेश होता.
       हे यशस्वी प्रकरण नवजात बाळांमधील जीवघेणाऱ्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी वेळीच निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि रुग्णालयातील एकत्रित तज्ज्ञ सेवांची अत्यंत महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…