Home शासकीय मतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी 3096 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले दुसरे प्रशिक्षण

मतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी 3096 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले दुसरे प्रशिक्षण

2 min read
0
0
31

no images were found

मतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी 3096 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले दुसरे प्रशिक्षण

कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी 20 प्रभागांतील 595 मतदान केंद्रांवरील 3245 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुसरे प्रशिक्षण घेतले.

            हे प्रशिक्षण राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील हॉल, सायबर कॉलेज आनंद भवन, स.म.लोहिया राम गणेश गडकरी सभागृह व राजाराम कॉलेज याठिकाणी पार पडले. हे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतले. या प्रशिक्षण केंद्रांना प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.

            आज झालेल्या प्रशिक्षणात एकूण 3096 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रावरील साहित्याची तपासणी, बैठक व्यवस्था, लाईट व पाणी व्यवस्था, अभिरुप मतदान पध्दती, निवडणूकीपुर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष सिलिंग प्रक्रिया, अक्षेपित मतदान प्रत्यक्ष सुरु करण्याची वेळ, सिलबंद लखोटे, ई.व्ही.एम. मशीन हाताळणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शेवटच्या मतदानापर्यंत मतदान प्रक्रिया परिपुर्ण राबविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षणाबाबतची माहिती सहज आणि सोप्या पध्दतीने देण्यात आली.  या प्रशिक्षणामध्ये आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळून निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक राहावी, हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

            सदर प्रशिक्षण प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी अतिरिक्त रविकांत आडसुळ, आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर सानप, संदीप भंडारे, शक्ती कदम, सुशील संसारे, हरेश सुळ, समीर शिंगटे, श्रीमती रुपाली चौगुले तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र यादव, ऋतूराज निकम, विजय जाधव, श्रीमती रोहिणी गायगोपाळ, संजय काटकर, सुधीर वाघमारे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…