Home सामाजिक जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग

4 second read
0
0
47

no images were found

जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग

 
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 उघडले आहेत. त्यामधून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.
भोगावती नदीवरील –  तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
कासारी नदीवरील – यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली व बाजारभोगाव.
वेदगंगा नदीवरील – निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली.
कुंभी नदीवरील – कळे.
वारणा नदीवरील – चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची, शिगांव.
दुधगंगा नदीवरील – दत्तवाड व बाचणी.
तुळशी नदीवरील – बीड असे 33 बंधारे पाण्याखाली आहेत.
पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 37.1 फूट, सुर्वे 36.10 फूट, रुई 69.6 फूट, इचलकरंजी 63, तेरवाड 55.2 फूट, शिरोळ 49 फूट, नृसिंहवाडी 49.1 फूट,
राजापूर 36.1 फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 14.3 फूट व अंकली 21.3  फूट अशी आहे.

जिल्हयातील धरण पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजता प्राप्त अहवालानुसार धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे.
राधानगरी – 8.32 (8.361 टी. एम. सी), तुळशी 2.22 (3.471 टी. एम. सी), वारणा 29.01 (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 17.39 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.26 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.27 (2.715 टी. एम. सी), पाटगाव 3.05 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 1.08 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.61 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.12 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ 1.15 (1.240 टी. एम. सी ) आणि कोदे ल. पा. 0.21 (0.214).

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…