Home क्राईम समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी अपघातात १७ कामगारांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी अपघातात १७ कामगारांचा मृत्यू

2 second read
0
0
27

no images were found

समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी अपघातात १७ कामगारांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर गर्डर लाँचिंग करत असताना तो कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरंळाबे येथे  हा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १७ कामागारांचा जीव गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १७ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्याबाबत आम्ही आता अधिकारी, पालकमंत्री हे त्या ठिकाणी पोहचले आहेत. बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. मृतांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे. तसंच हा अपघात कसा झाला त्याची चौकशी होईल आणि कारवाईही केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले.  एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…