
no images were found
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचा नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीच्या साक्षीनं कार्यालय प्रवेश संपन्न
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीन गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. या अध्यक्षांचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीने पक्ष कार्यालय प्रवेश सोहळा पार पडला.
भाजपाच्या वतीने संघटनात्मक बळकटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यात 70 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नव्या आणि युवा वर्गाला संधी देण्यात आली आहे. कोल्हापूर महानगर साठी विजय जाधव तर ग्रामीण विभागासाठी राजवर्धन नाईक निंबाळकर आणि राहुल देसाई यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. या तीनही जिल्हाध्यक्षांचा पक्ष कार्यालय प्रवेश आज नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
नवीन कार्यालयात नूतन अध्यक्ष लोकाभिमुख कार्य करतील असे सांगत चंद्रकांतदादा यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा आणि इतर निवडणुकीसाठी सूत्रबद्ध कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
यावेळी सुहास आण्णा लटोरे, माजी आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, निवडणूक प्रभारी भरत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, माजी राज्य मंत्री भरमू अण्णा, पाटील, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, अरुण इंगवले, वल्लभ देसाई, के एस चौगुले, राजाराम शिफुगडे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.