no images were found
‘वंशज’मध्ये डीजेच्या धोरणात्मक चालींनी महाजन कुटुंबात उठवले वादळ
सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेने आपल्या अनपेक्षित कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना रोमांचित करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. महाजन परिवारातील सत्तासंघर्ष आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधावरही मालिकेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. गेल्या काही भागांमध्ये युविका (अंजली तत्रारी) हिने महाजन साम्राज्याची चेअरमन म्हणून नव्या व्यावसायिक सफरीचा प्रारंभ केला असल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.
मालिकेच्या आगामी भागांत कुटुंबाने घेतलेल्या एका निर्णयाच्या स्वीकारार्हतेसाठी संघर्ष सुरू झाल्याचे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या सिंहासनाचा वारसदार म्हणून आपली निवड न झाल्यामुळे विशेषकरून डीजे (माहिर पांधी) हा भावनिक घुसमटीतून जात आहे. त्याच्यातील राग पराकोटीची सीमा गाठते जेव्हा तो बोर्डरूममध्ये घुसून युविकाच्या दिशने चक्क बंदूक दाखवतो. दरम्यान तो युविकाला स्वीकारण्यासाठी अटीशर्तींवर उतरतो, हे सत्य आहे का? की नुसताच एक देखावा? इतरांना मूर्ख बनवण्यासाठी खेळलेली एक चाल? आणि त्याला कोण मदत करत आहे? त्याला बोलविता धनी गडद अंधारात दडून बसलेला आहे. तो पडद्यामागूनच या अत्यंत मोठ्या व्यावसायिक कुरघोडीची सूत्रे हलवतो आहे.
मालिकेत युविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली तत्रारी म्हणाली की, “अगदी इतिहासातही वारसा हक्काची मालकी ही जेंडरपुरतीच मर्यादित राहिलेली आहे, यातही वारसदार म्हणून पुरुषांनाच प्राधान्य देण्यात आलेले आहे. आमची वंशज ही मालिका संघर्ष आणि मुक्ततेचा विजय तसेच तुमच्यातील गुणवत्ता झळाळून उठू देण्याचा संदेश देते. तिच्यातील लवचिकता आणि दृढनिश्चय साकारण्याची संधी मिळणे हा एक सन्मानच आहे. परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या कथानकावरही मालिकेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.”