Home Uncategorized दिशा सालियानप्रकरणी साडेतीन वर्षांनंतर का होतेय SIT चौकशी?

दिशा सालियानप्रकरणी साडेतीन वर्षांनंतर का होतेय SIT चौकशी?

9 second read
0
0
24

no images were found

दिशा सालियानप्रकरणी साडेतीन वर्षांनंतर का होतेय SIT चौकशी?

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येप्रकरणी आता शिंदे सरकार एसआयटी चौकशी करणार आहे. त्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. डीआयजी रँकचे अधिकारी या SIT च्या कामाचं निरीक्षण करतील. दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी अनेक आमदारांनी केली आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात SIT चौकशीचे आदेश दिले होते. आता एसआयटी गठीत केली जाणार असून चौकशीला सुरुवात होणार आहे.
      गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेत उचलण्यात आला होता. तेव्हा शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दिशा सालियनच्या मृत्यूचाही मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली. शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनीसुद्धा असा आरोप केला होता की सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर ‘AU’ नावाने 44 वेळा फोन आले होते. राहुल शेवाळे यांनी असाही दावा केला होता की बिहार पोलिसांच्या मते एयूचा अर्थ आदित्य आणि उद्धव ठाकरे असा आहे. तेव्हापासून AU नक्की कोण आहे, याच्या तपासाची जोरदार मागणी केली जाऊ लागली. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणेंनी केली होती.
     कर्नाटकच्या उडुप्पी याठिकाणी जन्मलेली दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं. याशिवाय ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सीसोबतही जोडली गेली होती. टीव्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती आणि मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता.
      9 जून 2020 रोजी दिशा सालियानचा मुंबईतील मालाड इथल्या एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. नंतर दिशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशीही जोडण्यात आलं होतं. कारण त्याच्या 5 दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 रोजी सुशांतचं निधन झालं होतं. 28 वर्षीय दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. तर ऑगस्ट 2021 मध्ये पोलिसांनी याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केली होती. पोलिसांच्या मते याप्रकरणी त्यांना कोणतेच पुरावे मिळाले नाहीत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…