no images were found
जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे – राहुल रेखावार
कोल्हापूर : पर्यटन मंत्रालयाने ग्रामीण पर्यटन स्पर्धांची दुसरी आवृत्ती जाहीर केली आहे. सर्वोत्कृष्ट पर्यटन खेडे आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण होम स्टे स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन उद्योगाचा शाश्वत विकास हे ध्येय ठेवून देशातील सर्वोतम ग्रामीण पद्धतींना चालना देणे आणि प्रोत्साहन देणे हे या स्पर्धांचे उद्दिष्ट आहे. दोन्ही स्पर्धांसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कोल्हापुरात पर्यटकांसाठी भरपूर नैसर्गिक क्षमता आहे आणि अशा उपक्रमांद्वारे ती प्रकाशात आणली जाऊ शकते. सर्वोत्कृष्ट पर्यटन गावासाठी 2023 ची आवृत्ती: भुदरगड तालुक्यातील पाटगावने कांस्य गटात पारितोषिक पटकावत कोल्हापूरच्या फेट्यात आणखी एक मनाचा तुरा रोवला. या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे थोडक्यात निकष खालीलप्रमाणे आहेत.
सर्वोतम ग्रामीण होमस्टेसाठी पात्रता निकष- स्पर्धेचे 13 श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे, ज्यामध्ये काही हिरवे, समुदाय संचालित, महिलांचे नेतृत्व, सर्व समावेशक, वारसा आणि संस्कृती, क्लस्टर इत्यादी. ग्रामीण होमस्टे हे ग्रामीण भागात असले पाहिजे. ग्रामीण होमस्टे किमान एक वर्ष चालू असणे आवश्यक आहे. ग्रामीण होमस्टे राज्याकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ग्रामीण होमस्टेमध्ये योग्य सुलभता असावी. एक ग्रामीण होमस्टे जास्तीत जास्त 3 श्रेणीसाठी अर्ज करु शकतो.
सर्वोतम पर्यटन गावासाठी पात्रता निकष- स्पर्धेचे 10 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. वारसा, कृषी पर्यटन, हस्तकला, जबाबदार पर्यटन, आध्यात्मिक आणि निरोगीपणा, साहसी पर्यटन, समुदाय संचालित इत्यादी. अर्ज व्यक्तींसाठी खुले नाहीत. कमी लोकसंख्येची घनता आणि 25 हजार पेक्षा जास्त रहिवासी नाहीत. प्रसिद्ध ठिकाणे, पर्यटन स्थळे किंवा लँडस्केपच्या त्रिज्येमध्ये स्थित. शेती, हस्तकला, पाककृती इत्यादींसह पारंपरिक क्रियाकलाप असणे.
दोन्ही स्पर्धांचे मुख्य उद्दिष्टे ग्रामीण स्थळांचा विकास, ग्रामीण लोकसंख्येचे सक्षमीकरण, नैसर्गिक व सांस्कृतिक संसाधनाचे संरक्षण त्याच बरोबर प्रगती व डिजिटलायझेशन असे आहे. स्पर्धांसाठी सहभागी गावे किंवा ग्रामीण होम स्टे चे मूल्यांकन सहभागींनी पूर्ण केलेले SDG चे (शाश्वत विकास उद्दिष्टे) लक्षात घेऊन जिल्हा, राज्य आणि राष्ट्र मूल्यमापन समिती या तीन श्रेणीमध्ये केले जाणार आहे. पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा याबद्दल अधिक माहिती http://www.rural.tourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तहसीलदार कार्यालयातील तालुकास्तरीय पर्यटन समित्यांमधूनही नामनिर्देशनपत्रे १० डिसेंबर पर्यंत पाठवता येणार असल्याचे जिल्हा पर्यटन समितीमार्फत कळविण्यात आले आहे.